राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली महाड येथील दरडग्रस्त तळीये गावाची पाहणी पुष्पचक्र अर्पण करून मृतांना वाहिली श्रध्दांजली
अलिबाग,जि.रायगड,दि.27 (जिमाका):- महाड तालुक्यातील तळीये गावातील झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या घटनेमध्ये सर्व परिवार मृत पावले आहेत, यामुळे आम्ही सर्व दुःखी आहोत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे, या शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (दि.27 जुलै) रोजी महाड मधील तळीये या गावी शोक व्यक्त केला आहे. राज्यपाल श्री.कोश्यारी आज महाड तालुक्यातील तळीये या दरडग्रस्त गावाची पाहणी करण्याकरिता आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार आशिष शेलार,जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी महाड निलेश तांबे, महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, महाड तहसिलदार सुरेश काशीद, सुधागड तहसिलदार दिलीप रायण्णावर,तळा तह...