Posts

Showing posts from March 23, 2025

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रम तयारीचा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा

Image
    रायगड (जिमाका) दि.28 :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमासाठी  दुर्गराज रायगडावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा दि.12 एप्रिल रोजी प्रस्तावित आहे.  या दौऱ्याच्या पूर्वतयारीचा आढावा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज घेतला. या आढावा बैठकीला दुर्गराज किल्ले रायगड येथे महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, रोहयो मंत्री भरत गोगावले, आ.प्रविण दरेकर, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आणि किल्ले परिसराची पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम आणि पाणी पुरवठा विभाग, महावितरण, भारतीय पुरातत्व विभाग, आरोग्य विभाग, गृह विभाग यांच्या माध्यमातून आवश्यक ती कामे गड आणि गड परिसरात सुरु आहेत. याची पाहणी केली आणि माहिती घेतली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्य...

आगामी सण, उत्सव कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करावेत---महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे

Image
    रायगड (जिमाका) दि.27 : श्रीराम नवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि गुढी पाडवा व रमजान ईद हे सण, उत्सव कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करण्यासाठी सर्वांनी जिल्हा प्रशासनासह पोलिस यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले. तसेच या कालावधीत जिल्हा पोलिसांची सोशल मीडियवर करडी नजर असून कुणीही सामाजिक एकता व सलोखा तसेच शांतता भंग करणारा मजकूर प्रसारीत करू नये, असे आवाहनही कु.तटकरे यांनी केले. रायगड जिल्हा प्रशासनाच्या मार्फत गुढीपाडवा, रमजान ईद, श्रीराम नवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नियोजन भवन सभागृहात शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती.  यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.   या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्यासह शांतता समिती सदस्य, सर्व उपविभागी...

रेशन कार्ड धारकांनी 31 मार्च पूर्वी ई-केवायसी करणे अनिवार्य

    रायगड (जिमाका) दि.26 : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अन्नधान्याचा लाभ घेणाऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी ई-केवायसी करणे शासनाने अनिवार्य केले आहे. यासाठी 31 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी सर्वांनी तात्काळ ई-केवायसी करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. राज्यातील रेशन कार्ड धारकांना घरबसल्या ई-केवायसी करण्यासाठी अॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच, जिल्ह्यातील रास्त भाव दुकानदारही शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. नागरिकांनी याचा लाभ घ्याव. रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये 30.92% लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही. सुरुवातीला 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती, मात्र नागरिकांच्या सोयीसाठी ती वाढवून 31 मार्चपर्यंत करण्यात आली आहे.  संबंधित लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा त्यांना रेशनचे धान्य मिळण्यमध्ये अडचण येऊ शकते. अनेक कार्डधारकांना अंगठ्याचे स्कॅनिंग ई-पॉस मशीनवर होत नसल्यामुळे त्रास होत होता. आता त्यावर तोडगा म्हणून ई-पॉस मशीनवर डोळे स्कॅन करून ई-केवायसी पूर्ण...

महाराष्ट्र राज्य वन विभागामध्ये भरती माजी सैनिक व माजी सैनिक विधवा यांनी लाभ घ्यावा

  रायगड(जिमाका)दि.26:- 136 ईंफ्रट्री बटालीयन (टी.ए.)ईको महार रेजीमेंट मध्ये दि.21 एप्रिल ते 23 एप्रिल 2025 दरम्यान महाराष्ट्र राज्य वन विभागामध्ये भरती होणार असून माजी सैनिक व माजी सैनिक विधवा यांनी एस.आर.पी.एफ.कँप ग्राऊंड धुळे येथे उपलब्ध रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग ले.कर्नल राहुल वैजनाथ माने (निवृत) यांनी केले आहे.   ००००००