छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रम तयारीचा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा

 


 

रायगड (जिमाका) दि.28 :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमासाठी  दुर्गराज रायगडावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा दि.12 एप्रिल रोजी प्रस्तावित आहे.  या दौऱ्याच्या पूर्वतयारीचा आढावा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज घेतला.

या आढावा बैठकीला दुर्गराज किल्ले रायगड येथे महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, रोहयो मंत्री भरत गोगावले, आ.प्रविण दरेकर, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आणि किल्ले परिसराची पाहणी केली.

सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम आणि पाणी पुरवठा विभाग, महावितरण, भारतीय पुरातत्व विभाग, आरोग्य विभाग, गृह विभाग यांच्या माध्यमातून आवश्यक ती कामे गड आणि गड परिसरात सुरु आहेत. याची पाहणी केली आणि माहिती घेतली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमांची पूर्वतयारी, प्रोटोकॉलनुसार त्यासाठी गड परिसर आणि गडावर विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.   पुण्यतिथी कार्यक्रमाची सर्व तयारी प्रशासनाने करताना उन्हाची परिस्थिती लक्षात घ्यावी. त्यासाठी आवश्यक नियोजन करावे अशा सूचनाही यावेळी त्यांनी केल्या. किल्ल्यावर जाण्यापूर्वी मंत्री महोदयांनी पाचाड येथील राजमाता जिजाऊ यांच्या समाधी स्थळास भेट दिली व पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज