रंग दे महाराष्ट्र द्वारे रंगल्या शाळांच्या भिंती: सामाजिक एकोपा हीच परिवर्तनाची गुरुकिल्ली- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी
अलिबाग, जि. रायगड, (जिमाका)दि.28:- जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियान राबविण्यात येत आहे. मात्र सामाजिक परिवर्तन घडवून प्रगती साधायची असेल तर गावात एकोपा असणे आवश्यक आहे. गाव एक झालं तर काहीही साध्य करु शकते. सामाजिक एकोपा हीच खरी परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे', असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज मुठवली ता. माणगाव येथे केले.यावेळी ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक उपस्थित होते. या अभियानांतर्गत निवडलेल्या निवडक गावातील कामांची पाहणी करुन ग्रामस्थांशी चर्चा या पथकाने आज केली. त्या अंतर्गत आज सकाळी मुठवली या गावी आज सकाळी ग्रामस्थांशी सर्व अधिकाऱ्यांनी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्यासह जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव,प्रांताधिकारी देगावकर, तहसिलदार उर्मिला पाटील, गटविकास अधिकारी खेडकर,उपविभागीय कृषि अधिकारी येवले तसेच स्वदेस फाऊंडेशचे तुषार ईनामदार तसेच ग्राम सामाजिक परिवर्तक लहू दोलताडे यांच्यासह ग्रामस्थ महिला, पुरुष मोठ्...