गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन


अलिबाग, जि. रायगड, (जिमाका) दि.25- महाराष्ट्र शासनाने शासन निर्णयाद्वारे संपूर्ण राज्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबविण्याचे धोरण निश्चत केले आहे. या योजनेची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत.
या योजने अंतर्गत जिल्ह्यातील 0 ते 250 हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या असलेल्या गाव तलाव, पाझर तलाव, साठवण तलाव, लघु पाटबंधारे योजने मधील गाळ फक्त लाभधारकाच्या (शेतकरी, ग्रामपंचायत, शासनाचे सर्व विभाग) क्षेत्रात टाकणे अभिप्रेत आहे. सदर योजने अंतर्गत लाभधारकांना आवश्यक गाळ काढण्याच्या यंत्र सामुग्रीचे इंधन खर्च शासनामार्फत अदा करण्यात येणार आहे. गाळ वाहतूक खर्च संबंधित लाभधारकाने स्व:खर्चाने करणे अपेक्षित आहे.
या योजनेच्या मागणी करीता ऑफलाईन पध्दतीने संबंधित तहसीलदार यांचेकडे मागणी करता येईल. ऑनलाईन पध्दतीने महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार या पोर्टलवर मागणी करता येईल. ही मागणी वर्षभरात केव्हाही करता येणार आहे. तरी इच्छुक लाभधारकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचे जिल्हा स्तरीय समिती सदस्य सचिव  यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज