अवयवदान - काळाची गरज
महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती
कार्यालय, रायगड-अलिबाग
|
||
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
|
|
Twitter-@dioraigad
Facebook-dioraigad
|
दिनांक 29 ऑगस्ट 2016 लेख : 26
अवयवदान - काळाची गरज
भारतीय
संस्कृतीमध्ये दानाचे महात्म्य ठिकठिकाणी वर्णन केलेले आहे. काळानुसार गोदान, भूदान,वस्त्रदान अशा अनेक
स्वरुपातील दानांचे वर्णन आपल्या पौराणिक ग्रंथांमध्ये देखील केलेले दिसून
येते. केवळ ग्रंथांमध्येच नव्हे तर दान
करणे हा आपल्या जीवनशैलीचाच एक भाग बनून गेला आहे. रस्त्यावरील याचकांपासून ते मंदिर, तीर्थक्षेत्र
इत्यादी ठिकाणी जाऊन आपण सहजपणे दान करतो.
खरोखर इतके सहज आपण दान करतो की, या हाताने केलेले दान दुसऱ्या हाताला
देखील समजत नाही.
दि.30
ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2016 या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात महा अवयवदान अभियान
राबविण्यात येणार आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबरच आपण वैद्यकीय क्षेत्रात
देखील प्रगती केली आहे. त्यामुळेच एका व्यक्तीचे अवयव दुसऱ्या गरजू
रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपित करुन त्या रुग्णाला जीवनदान देणे आता शक्य झाले
आहे. त्याबाबतचा हा लेख
|
आपण थोडा
विचार करु या की , दान केल्याने आपल्याला असे काय मिळते की आपण इतक्या सहजपणे दान
करतो व आपल्या संस्कृतीनेदेखील दान
करण्याचे संस्कार इतक्या खोलवर आपल्यामध्ये का रुजवलेले आहेत? खरे तर दान केल्याने
दात्याला समाधान मिळते व गरजवंताची गरज पूर्ण होते. म्हणजेच दान करण्याच्या
वृत्तीमुळे ज्याठिकाणी एखादी वस्तू अधिक प्रमाणात आहे, त्या ठिकाणाहून त्या
वस्तूची जेथे कमतरता आहे, उणीव आहे त्या ठिकाणी ती वस्तू हस्तांतरीत केली जाते.
आधिक्य व उणीव यांच्यामधील दरी दानाच्या माध्यमातून भरुन काढली जाते व त्यामुळे
आपोआपच निसर्गात समतोल साधला जातो आणि पर्यायाने शांती व सुख निर्माण होते.
म्हणजेच दानाच्या माध्यमातून आपण या जगामध्ये मागील हजारो वर्षांपासून शांती व सुख
निर्माण करीत आहोत.
काळानुसार
जीवसृष्टीच्या गरजा बदलल्या त्यानुसार दानाचे स्वरुपदेखील बदलले आहे. जर एखाद्या ठिकाणी
एखाद्या वस्तूची कमरता असेल तर ती वस्तू मिळविण्यासाठी सर्वांमध्ये चढाओढ लागते व
स्पर्धा निर्माण होते. त्या वस्तूची कमतरता जर तीव्र स्वरुपात असेल तर कलह,
आपापसात भांडणे निर्माण होतात, यातून दुराचार वाढतात व परिणामी सर्वत्र
असुरक्षितता निर्माण होते, ही असुरक्षितता दूर करण्यासाठी, कलह मिटविण्यासाठी व
शांतता निर्माण करण्यासाठी आपण हजारो वर्षांपासून दान करणे हा उपाय शोधून काढला
आहे असे सुक्ष्म विचारांती आपल्या लक्षात
येईल.
प्रत्यारोपणाची
गरज
गतीमान आयुष्यामुळे
आपल्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम ही आजच्या काळातील आपल्यापुढील एक मोठी
समस्या आहे. आपल्या बहुतेकांच्या जीवनातील
दु:खाचे कारण शारीरीक आजार हे आहे. आज डायबेटी, उच्च रक्तदाब, किडनी स्टोन इत्यादी
आजारांमुळे किडनी हा अवयव निकामी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर अत्याधिक मद्यपानाची सवय,जंतूसंसर्ग
यासारख्या कारणांनी यकृत प्रत्यारोपणाची गरज देखील वाढली आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील
प्रगतीमुळे तज्ञांच्या उपलब्धतेमुळे आपण किडनी यकृत, स्वादुपि, ह्दय,
फुफ्फुस,त्वचा, नेत्र,हाडे,लहान आतडे हे अवयव एका व्यक्तीच्या शरीरातून दुसऱ्या
व्यक्तीच्या शरीरात प्रत्यारोपित करु शकतो.
परंतु कमतरता आहे ती अवयव दात्यांची दरवषी
भारतात 5 लाख रग्णांना किडनी प्रत्यारोपणाची, 3 हजार रग्णांना यकृत प्रत्यारोपणाच
व 2 हजार रुग्णांना ह्दय प्रत्यारोपणाची आवश्यकता
असते. परंतु यापैकी केवळ 5 टक्के
रुग्णांमध्येच अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होऊ शकल्या आहेत. उरलेले 95 टक्के
रुग्ण दरवर्षी अवयव दात्यांच्या प्रतिक्षेत राहत आहेत. आजमितीस केवळ महाराष्ट्र राज्यात 12000 रुग्ण
किडनी मिळण्यासाठी प्रतिक्षेत आहेत.
अवयवदात्यांच्या
कमतरतेमुळेच आपण मागील काळत किडनी रॅकेट संबंधी अनेक बातम्या टिव्ही व
वृत्तपत्रांच्या माध्यमातून पाहिल्या व वाचल्या आहेत. समाजातील या गैरप्रकारांना वेळीच आळा
घालण्यासाठी आपल्या समाजात अवयव दानाबद्दल मोठया प्रमाणावर जनजागृती करुन अवयव
दात्यांची संख्या वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. कोणतीही व्यक्ती जीवंतपणे आपली एक
किडनी वा यकृताचा काही यांचे दान करु शकते.
अपघात किंवा इतर कारणाने एखादा मेंदू अकार्यक्षम झाला असेल परंतु इतर अवयव
कार्यरत असतील अशा मेंदुमृत व्यक्तीच्या शरीरातील अवयव कार्यरत असतील अशा मेंदुमृत
व्यतीच्या शरीरातील अवयव दुसऱ्या रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपित करता येतात. मेंदुमृत व्यक्ती ही कालातराने मृत्यू पावणार
हे निश्चित असते. तसेच संपूर्ण मृत
पावलेल्या व्यक्तीचे डोळे व त्वचा हे अवयव
3 तासांच्या आत प्रत्यारोपित करता येतात.
महा अभियान
अशारीतीने जीवंतपणी
मेंदुमृतावस्थेत व मृत्यूपश्चात अशी तीन अवस्थांमध्ये विशिष्ट कालावधीत आपण
अवयवदान करु शकतो. त्यासाठी आपण अवयवदान
करण्यास इच्छुक आहोत याची माहिती देणारा एक फॉर्म भरणे आवश्यक असते. तसेच आपल्या नातेवाइकांना देखी आपल्या
अवयवदानाच्या इच्छेबाबत माहित असणे गरजेचे असते.
दि.30 आगस्ट रोजी आपल्या
राज्यात सर्वत्र अवयवदानांबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे व 1 सप्टेंबर रोजी
राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये अवयवदानाचे संमतीपत्र भरुन घेतले जाणार
आहेत. वैद्यकीय शिक्षण व संशोधन
विभागाच्या www.dmev.ovg या संकेतस्थळावर जाऊन आपण केव्हाही अवयवदानाचा फॉर्म भरु
शकतो. रक्तदानाप्रमाणेच भविष्यात कधी
कोणाला कुठे अवयवदानाची गरज लागेल हे सांगता येत नाही. म्हणूनच सर्वांमध्येच याबाबतीत जागरुकता
निर्माण होणे आवश्यक आहे. आपण समाजातील
सर्वांनी एकत्र येऊन याकरिता अवयवदानाच्या रुपाने आपली सोय करणे आपल्या
सर्वांच्याच हिताचे आहे. तेव्हा आपण सर्वांनी एकत्र येऊ या व या
महाअवयदान अभियानात सहभागी होऊ या.
आपले शरीर ही एक अनमोल
संपत्ती आहे. मरणोत्तर अवयवरुपी दानाने या
निसर्गाने, समाजाने आपल्यावर केलेल्या ऋणातून मुक्त होण्याची संधी आपल्याला मिळणार
आहे. याहून वेगळे पिंडज्ञान व मोक्षाचे
साधन कोणते असेल का? याचाही विचार करावा.
0000
डॉ.सुप्रिया
वि.वेटकोळी-देशमुख
( मार्फत जिल्हा माहिती
कार्यालय)
Professional and trustworthy! My plates arrived on schedule and without any problems, and the booking process was easy.
ReplyDeleteMy hsrp
No hassle service! My HSRP was easy to order, and it was quickly installed. Fantastic work, team!
ReplyDeleteMy hsrp
Best platform for booking HSRP! Rapid updates and seamless delivery. 💪
ReplyDeleteMy hsrp
HSRP simplified! Booking my HSRP is quick, seamless, and hassle-free. ✅
ReplyDeleteMy hsrp
No more uncertainty! My HSRP Book offers precise information and quick service. 🚗
ReplyDeleteMy hsrp
Quick service, precise updates! Opt for Book My HSRP—it’s the best option. ✅
ReplyDeleteBook my hsrp