महाराष्ट्र दिन समारंभ रायगड जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी सदैव कटिबध्द -पालकमंत्री प्रकाश महेता

महाराष्ट्र दिन समारंभ रायगड जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी सदैव कटिबध्द -पालकमंत्री प्रकाश महेता अलिबाग दि.1 (जिमाका) रायगड जिल्हयाच्या विकासासाठी आपण सदैव कटिबध्द असून सर्वांच्या साथीने रायगड जिल्हा राज्यात अग्रेसर होण्यासाठी प्रयत्न करु असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश महेता यांनी महाराष्ट्र दिन वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतांना केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त आज सोमवार, दि.01 मे 2017 रोजी त्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण व राष्ट्रध्वज वंदन समारंभ अलिबाग येथील पोलीस परेड मैदानावर उत्साहात संपन्न झाला.त्यावेळी ते बोलत होते. या समारंभासाठी ...