स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त थळ सागरी किनारा स्वच्छता अभियान संपन्न

अलिबाग, दि.20 (जिमाका):- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रांताधिकारी प्रशांत ढगे व तहसिलदार मीनल दळवी यांच्या पुढाकारातून अलिबाग तहसील कार्यालय, माणुसकी प्रतिष्ठान, लाईफ फाउंडेशन, वा.ग. रानडे हायस्कूल, थळ ग्रामपंचायत व थळ ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने थळ-चालमळा समुद्रकिनारा येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार अजित टोळकर यांनी स्वच्छतेबद्दल जागृत झाले पाहिजे व आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, असे सांगितले. माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.राजाराम हुलवान यांनी आरोग्य व स्वच्छतेचे महत्त्व सर्व शालेय विद्यार्थ्यांना सांगत आपला परिसर, आपली शाळा, आपले घर स्वच्छ ठेवून आपण स्वतः निरोगी कसे राहावे, याबद्दल मार्गदर्शन केले. या स्वच्छता अभियानात अंदाजे 85 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. उपस्थित स्वयंसेवकांना प्लॅस्टिक मुक्तीची व वृक्ष संवर्धनाची शपथ देण्यात आली. 00000