मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी सन 2021-22 या शैक्षणिक वर्षामध्ये शिष्यवृत्ती मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावेत - सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव
अलिबाग, दि.03,(जिमाका):- सन 2018-19 पासून महाराष्ट्र शासनातर्फे सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी एकत्रित संकेतस्थळ विकसित करण्यात आलेले आहे. महाडीबीटी हे या संकेतस्थळाचे नाव असून http:/mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ हे संचालक, माहिती व तंत्रज्ञान (DIT) यांच्यामार्फत कार्यान्वित करण्यात आलेले आहे. सन 2021-22 साठी शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क तसेच इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी व सन 2020-21 करिता नूतनीकरण करण्यासाठी हे संकेतस्थळ पुनःश्च चालू करण्यात आले आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी दि.28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तरी विद्यार्थ्यांनी आपले अर्ज तात्काळ नोंदणीकृत करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे. या डीबीटी पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांच्या खात्यावर त्यांना देय होणारा शिष्यवृत्ती निर्वाह भत्ता, शिक्षण फी, परीक्षा फी, इतर अनुज्ञेय फी, त्यांच्या आधार संलग्न खात्यावर थेट वितरीत केला जाणार आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांनी आपले आधारकार्ड क्रमांक आपल्या बँक खात्याशी संलग्न करुन घ्यावे. महाडीबीटी ची वैशिष्ट्ये:-...