राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्यास मुदतवाढ

 


  अलिबाग, दि.03, (जिमाका):- राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, सोशल मीडिया आणि स्वछता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखाणासाठी दरवर्षी विविध पुरस्कार स्पर्धा घेतली जाते.

सन-2021 च्या पुरस्कारासाठी अर्ज करण्याची मुदत दि.15 फेब्रुवारी 2022 असून जिल्ह्यातील पत्रकारांनी या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज करावेत,असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले आहे.

या स्पर्धेसाठी दि.01 जानेवारी ते दि.31 डिसेंबर 2021 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखनाच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील स्पर्धेकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करून घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in किंवा www.maharashtra.gov.in येथेही उपलब्ध आहेत.

000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत