Posts

Showing posts from November 23, 2025

नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम-2025 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 प्रमाणे बंदी आदेश जारी

  रायगड-अलिबाग,दि.28 (जिमाका):-  मा.राज्य निवडणूक आयोगाने दि.04 नोव्हेंबर, 2025 रोजीच्या आदेशान्वये राज्यातील नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम-2025 जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार रायगड जिल्ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायत हद्दीमध्ये मंगळवार दि.02 डिसेंबर 2025 रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. या निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक निकाल जाहिर होईपर्यंत आचारसंहिता अंमलात राहणार असून, निवडणूक खुल्या व निर्भय वातावरणात पार पाडणे तसेच मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क निर्भयपणे बजावता येणे आवश्यक आहे. याकरिता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 नुसार जिल्ह्यातील (पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात) नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम-2025 च्या अनुषंगाने दि.02 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या नगरपरिषद/नगरपंचायत निवडणूकीच्या मतदान समाप्तीकरीता निर्धारित केलेल्या वेळेच्या 48 तास अगोदरच्या कालावधीमध्ये खालील कृती करण्यास मनाई जारी केला आहे.  पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमण्यास किंवा फिरण्यास मनाई आहे. निवडणूक प्रचार करणे,...

दि.02 डिसेंबर रोजी आठवडा बाजार पूर्णवेळ राहणार बंद जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केला बंदी आदेश

  रायगड-अलिबाग,दि.28 (जिमाका):- जिल्ह्यातील (पोलीस अधीक्षक रायगड कार्यक्षेत्रातील) नगरपरिषद/नगरपंचायत मतदार संघात मंगळवार, दि.02 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार असून मतदार संघांच्या मतदार यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे, मतदाराला आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, तसेच मतदान सुरळीतपणे पार पडणे आवश्यक असल्याने मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील (पोलीस अधीक्षक रायगड कार्यक्षेत्रातील) नगरपरिषद/नगरपंचायत मतदार संघात ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरणार आहे, अशा सर्व ठिकाणी बाजार व जत्रा अधिनियम, 1862 चे कलम 5 (ग) मधील तरतुदीनुसार आठवडा बाजार पूर्णवेळ बंद ठेवण्याबाबतचा बंदी आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केला आहे. मा.राज्य निवडणूक आयोगाने दि.04 नोव्हेंबर 2025 रोजीच्या आदेशान्वये राज्यातील नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम-2025 जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार रायगड जिल्ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायत मतदार संघामध्ये मंगळवार, दि.02 डिसेंबर 2025 रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. ०००००००

हिंदू खाटीक समाजातील लोकांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीच्या सर्वांगीण विकासासाठी स्वयंरोजगाराच्या विविध कर्ज योजना

    रायगड-अलिबाग,दि.28 (जिमाका):-   राज्यातील अनुसूचित जातीतीत हिंदू खाटीक समाज आर्थिक महामंडळाची स्थापना दि . 05 जून 2025 रोजी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ अंतर्गत उपकंपनी म्हणून करण्यात आली आहे.  हिंदू खाटीक समाज आर्थिक महामंडळ मर्या.,( उपकंपनी ) मार्फत हिंदू खाटीक समाजातील लोकांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीच्या उद्देशाने त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी  स्वयंरोजगाराच्या विविध कर्ज योजना राबविण्यात येतात.          50 टक्के अनुदान योजना :-  प्रकल्प मर्यादा रु. 50,000/- पर्यंत.   प्रकल्प मर्यादेच्या 50  टक्के   किंवा जास्तीत जास्त 25,000/- पर्यत अनुदान देण्यात येते व उर्वरीत रक्कम बँकेमार्फत देण्‍यात येते. बँक कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात येते. कर्जाची परतफेड सर्वसाधारणपणे 3 वर्षात करावयाची आहे. बीज भांडवल योजना   :-   प्रकल्पमर्यादा रु. 50,001/- ते रु. 5 लाखापर्यंत. प्रकल्प मर्यादेच्या 20 टक्के    बीज भांडवल कर्ज महामंडळामार्फत 4  टक्के  द.सा.द....

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचे कर्ज प्रस्ताव महादिशा पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने सादर करावेत

          रायगड-अलिबाग,दि.28 (जिमाका):-   महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय रायगड मार्फत सन 2025-26 या अर्थिक वर्षाकरिता पात्र लाभार्थ्याकडून महामंडळ राबवीत असलेल्या विविध योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत असून  इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी या संधीचा  लाभ घेऊन ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन  महात्मा   फुले   मागासवर्ग   विकास   महामंडळाकडून करण्यात आले आहे.             अनुसूचित जाती व नवबौध्द लोकांच्या स्वयंरोजगारासाठी अर्थिक सहाय्य व सामाजिक उन्नतीच्या उद्देशाने त्यांच्या सर्वांगीन विकासासाठी हे महामंडळ राबवित असलेल्या योजनांची अंमलबजावणी होण्यासाठी भारत शासनाच्या प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजने  (PM-AJAY) अंतर्गत या योजनांद्वारे लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे, अर्थिक सक्षमीकरण घडवणारी आणि जीवनमान उंचावणे हा प्रमुख उद्देश या महामंडळाचा आहे.        ...