दि.02 डिसेंबर रोजी आठवडा बाजार पूर्णवेळ राहणार बंद जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केला बंदी आदेश


 

रायगड-अलिबाग,दि.28 (जिमाका):-जिल्ह्यातील (पोलीस अधीक्षक रायगड कार्यक्षेत्रातील) नगरपरिषद/नगरपंचायत मतदार संघात मंगळवार, दि.02 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार असून मतदार संघांच्या मतदार यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे, मतदाराला आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, तसेच मतदान सुरळीतपणे पार पडणे आवश्यक असल्याने मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील (पोलीस अधीक्षक रायगड कार्यक्षेत्रातील) नगरपरिषद/नगरपंचायत मतदार संघात ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरणार आहे, अशा सर्व ठिकाणी बाजार व जत्रा अधिनियम, 1862 चे कलम 5 (ग) मधील तरतुदीनुसार आठवडा बाजार पूर्णवेळ बंद ठेवण्याबाबतचा बंदी आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केला आहे.

मा.राज्य निवडणूक आयोगाने दि.04 नोव्हेंबर 2025 रोजीच्या आदेशान्वये राज्यातील नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम-2025 जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार रायगड जिल्ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायत मतदार संघामध्ये मंगळवार, दि.02 डिसेंबर 2025 रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत