पनवेल कोविड रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी कोविडविषयी मार्गदर्शन आणि मानसिक समुपदेशन सत्राचे आयोजन जिल्हा मानसोपचार तज्ञ डॉ.अमोल बाळासाहेब भुसारे यांनी केले मार्गदर्शन
अलिबाग,जि.रायगड दि.14 (जिमाका) :- पनवेल येथील कोविड रुग्णालय तथा उपजिल्हा रुग्णालय येथे कोविडविषयी मार्गदर्शन आणि मानसिक समुपदेशन सत्राचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ.बसवराज लोहारे, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुचिता गवळी, डॉ.राजपूत, डॉ.प्रमोद पाटील आणि इतर वैद्यकीय अधिकारी सह सर्व नर्सिंग स्टाफ सह कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. या सत्राचे प्रमुख वक्ते जिल्हा मानसोपचार तज्ञ डॉ.अमोल बाळासाहेब भुसारे यांनी करोना आजार आणि मानसिक समुपदेशन यावर मार्गदर्शन करताना रुग्णांची आजारादरम्यान असणारी मानसिक स्थिती, त्यासोबतच रुग्णांच्या नातेवाईकांची मानसिक स्थिती, सोशल मीडियाद्वारे मिळणारी अपूर्ण माहिती याचा सविस्तर अभ्यास करून लोकांना करोना रुग्णांशी कसे बोलावे, कोणती माहिती द्यावी, अपेक्षा वास्तव कशा ठेवता आल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत, रुग्णांच्या नातेवाईकांना व्यवस्थित आणि परिस्थितीसदृश्य माहिती पोहोचणे किती गरजेचे आहे त्यासोबतच रुग्णांसोबतचा आवश्यक असणारा संवाद, हा रुग्णाची प्रकृती सुधारण्यातला मोठा घटक असून त्यावर सर्वांन...