डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत मार्जिन मनी योजनेची कार्यशाळा व संविधान जागर रॅली संपन्न

अलिबाग,दि.13 (जिमाका):- सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड-अलिबाग कार्यालयामार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त दि.06 एप्रिल ते दि.16 एप्रिल 2022 दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यास अनुसरुन दि.12 एप्रिल 2022 रोजी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत मार्जिन मनी या योजनेचा लाभ देणे या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचा 22 नवउद्योजकांनी लाभ घेतला. या कार्यशाळेत स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत मार्जिन मनी या योजनेबाबत माहिती तसेच योजनेबाबत नवउद्योजकांनी उपस्थित केलेल्या शंकाचे निरसन करण्यात आले. तसेच सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांच्या प्रसार व प्रचाराकरिता जिल्हा व तालुका स्तरावर कार्यशाळा घेण्याचे निश्चित करण्यात आले. त्याचप्रमाणे दि.13 एप्रिल 2022 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर “ संविधान जागर रॅली ” चे आयोजन करण्यात आले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ.आंबेडकरांच्या पुर्णाकृती पूतळ्यास अभिवादन करून या रॅली...