जवाहर नवोदय विद्यालय सत्र 2022-2023 करीता इयत्ता 6 वी ची दि.30 एप्रिल रोजी निवड परीक्षा

अलिबाग, दि.12 (जिमाका):- जवाहर नवोदय विद्यालय, रायगडची सत्र 2022-2023 करीता इयत्ता 6 वी ची निवड परीक्षा दि.30 एप्रिल 2022 (शनिवार) रोजी रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर घेतली जाणार आहे.

प्रवेशपत्र जवाहर नवोदय विद्यालय समितीच्या https://cbseitms.nic.in/https://navodaya.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी श्री.संतोष आर. चिंचकर - 9881351601, श्री.कैलास. पी. वाघ 9527256185 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

तरी रायगड जिल्ह्यातील सर्व परीक्षार्थी व पालकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन जवाहर नवोदय विद्यालय, रायगडचे प्राचार्य के. वाय. इंगळे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज