राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण व जिल्हा वार्षिक योजना राबविण्यासाठी दि. 15 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ
रायगड, दि.8 (जिमाका):- क्षेत्रीय स्तरावर सध्या व्यापक प्रमाणावर सुरु असलेले वंध्यत्व निवारण शिबीरे इ. लक्षात घेता या योजनांमध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांना अर्ज भरता यावे, यासाठी सन 2023-24 या वर्षासाठी ah.mahabms या प्रणालीवर राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण व जिल्हा वार्षिक योजना राबविण्यासाठी दि.15 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली, असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सचिन देशपांडे यांनी दिली आहे. सन 2023-24 या वर्षासाठी ah.mahabms या प्रणालीवर राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण व जिल्हा वार्षिक योजना राबविण्यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले होते. या वेळापत्रकानुसार सन 2023-24 साठी ऑनलाईन अर्ज स्वीकारणे व जुने लाभार्थीमार्फत कागदपत्रे अपलोड करणे आणि जिल्हा स्तरावर कागदपत्रे पडताळणी करुन पडताळणी करून निवड पूर्ण करणे याची मुदत दि. 8 डिसेंबर 2023 रोजी संपुष्टात आली आहे. यासाठीचे नवीन वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे :- दि.9 नोव्हेंबर ते दि.15 डिसेंबर 2023 पर्यंत सन 2023-24 साठी ऑनलाईन अर्ज स्विकारणे, जुने लाभार्थीमार्फत कागदपत्रे अपलोड करणे आणि जिल्हा स्तरावर कागदपत्रे पडत...