वंध्यत्व निवारण शिबिराचा जिल्ह्यातील पशुपालकांनी लाभ घ्यावा


 

रायगड दि.4 (जिमाका) : महाराष्ट्र शासन व रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील 122 पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत दि.20 नोव्हेंबर ते दि.19 डिसेंबर या पूर्ण महिन्यात प्रत्येक गावात एक वंध्यत्व निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जनावरांमधील वंध्यत्व निवारणासाठी वंध्यत्व निवारण शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाने हा कार्यक्रम महत्त्वाकांक्षी कार्यक्रम म्हणून घोषित केला जिल्ह्यातील पशुपालकांनी आपल्या जनावरांचे वंध्यत्व निवारण करून दुग्ध उत्पादन वाढविण्याच्या या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाचे सर्व नियोजन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सचिन देशपांडे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी रायगड जिल्हा परिषद डॉ.श्यामराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली  करण्यात आले आहे.  अधिक माहितीसाठी आपण नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.

0000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत