“कोविशील्ड” लसीकरण मोहिमेचा पालकमंत्री कु.आदिती तटकरे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ संपन्न

अलिबाग,जि.रायगड दि.16 (जिमाका) :- केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे आज जिल्ह्यातील शासकीय जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथे “ कोविशील्ड ” लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री कु.आदिती तटकरे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा कु.योगिता पारधी, आमदार महेंद्र दळवी, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, आरसीएफ चे अधिकारी, जिल्हा रुग्णालयातील इतर वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. प्रारंभी “ कोविशील्ड ” लसीकरण केंद्राचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत फित कापून आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांना लस टोचण्यात येवून कोविशील्ड लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली. ...