दिव्यांग व्यक्तींना दर बुधवार-गुरुवारी दिव्यांग प्रमाणपत्र वितरण सुरु

 


 

            अलिबाग,जि.रायगड दि.16 (जिमाका) :- दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र तात्काळ (यू.डी.आय.डी.कार्ड) बनवून मिळण्यासाठी दर आठवड्यातील बुधवार व गुरुवार हे दोन दिवस निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार दर बुधवारी केवळ अस्थिव्यंग रुग्णांची तपासणी करण्यात येते, त्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर केवळ 50 अस्थिव्यंग रुग्णांना टोकन देऊन तपासणी करून त्यांना त्याच दिवशी प्रमाणपत्र वितरित येत, यासाठी विशेष तज्ञ वैद्यकीय अधिकारी व डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना सूचना देऊन तसे आदेश देण्यात आले आहेत.

            तसेच दर गुरुवारी अस्थिव्यंग सोडून इतर सर्व (नेत्रदोष, कर्णबधीर, मानसिक दोष इ.) दिव्यांगांची तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र वितरित केले जाण्याची व्यवस्था केली आहे. 

            या कामासाठी लागणारे संगणक, प्रिंटर आदि आवश्यक साधनसामुग्रीकरिता आरोग्य प्रशासनाला आरसीएफकडून सहकार्य मिळाले आहे.   

            अस्थिव्यंग रुग्णांना जिने चढताना अडचण येऊ नये, म्हणून दर बुधवारी अस्थिव्यंग रुग्णांची तपासणी तळमजल्यावरील ओपीडी नं.14 मध्ये जिल्हा शल्यचिकित्सक स्वत: बसून प्रमाणपत्र वाटप करण्याचे कामकाज सुरु करण्यात आले आहे. याप्रमाणे दिव्यांग प्रमाणपत्र वाटप बुधवार, दि. 30 डिसेंबर व गुरुवार दि. 31 डिसेंबर 2020 पासूनच अंमलात आले  आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी कळविले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज