बाल शक्ती व बालकल्याण पुरस्कार अर्ज सादर करण्यास 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.20 : केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती व बालकल्याण पुरस्कार दिला जातो. या बाल शक्ती व बालकल्याण पुरस्कार-2019 साठी केंद्र शासनाने अर्ज मागविलेले आहेत. सदरचे अर्ज हे www.nca-wcd.nic.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत. या पुरस्कारांची माहिती संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2019 अशी हेाती. आता ती दिनांक 30 सप्टेंबर 2019 पर्यंत पाठविण्यात आलेली आहे. बालशक्ती पुरस्कार पुढील प्रमाणे : ज्या मुलांनी (वय 5 पेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंतच्या) शिक्षण,कला,सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे त्यांना हा पुरस्कार दिला जातो. बालकल्याण पुरस्कार पुढीलप्रमाणे : वैयक्तिक पुरस्कार-मुलांच्या विकास,संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान 7 वर्षे काम ...