हरीतगृह/शेडनेटगृह उभारणी करणाऱ्या सेवा पुरवठादारांची नोंदणी




अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.17:- कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत हरीतगृह/शेडनेटगृह उभारणी करणाऱ्या सेवा पुरवठादारांची नोंदणी करणेसाठी जिल्हा स्तरावर अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी इच्छुकांनी अर्ज जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रायगड-अलिबाग, जिल्हा फळरोपवाटिका मु.राऊतवाडी, पो.वेश्वी ता.अलिबाग या कार्यालयास सादर करावा असे आवाहन पांडुरंग शेळके, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी केले आहे.
0000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज