बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या लाभासाठी अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत
अलिबाग, दि.7 (जिमाका):- रायगड जिल्हा परिषद, अलिबाग कृषी विभाग नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहत असून शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना राबवित असते. रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत/क्षेत्राबाहेरील) व राष्ट्रीय कृषी विकास योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांमध्ये नवीन विहीर या घटकाचा लाभ असल्याने जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली येवून पीक उत्पादनात वाढ होवून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास हातभार लागणार आहे. अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी आदिवासी उपयोजना (क्षेत्रांतर्गत/ क्षेत्राबाहेरील) व राष्ट्रीय कृषी विकास योजना बदललेल्या परिस्थितीची गरज विचारात घेवून जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टीकोनातून सध्याची प्रचलित आदिवासी उपयोजना ही बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत/क्षेत्राबाहेरील) या नावाने दि.30 डिसेंबर 2017 च्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येत आहे. लाभार्थी पात्रतेच्या अटी : लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा शेतकरी असला पाहिजे, शेतकऱ्याकडे...