भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्यास दि.28 फेब्रुवारी, 2022 पर्यंत मुदतवाढ प्रादेशिक उपायुक्त श्रीमती वंदना कोचुरे यांचे आवाहन

 


 

अलिबाग, दि.5 (जिमाका):- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत शासकीय वसतिगृह, शासकीय निवासी शाळेत सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, दि.28 फेब्रुवारी,2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी संबंधित जिल्ह्याच्या शासकीय वसतिगृह व शासकीय निवासी शाळा येथे प्रवेश घ्यावा. तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत अर्ज स्विकारण्यासाठी सुध्दा दि.28 फेब्रुवारी,2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, मुंबई विभाग, मुंबई श्रीम.वंदना कोचुरे यांनी केले आहे.

मुंबई विभागांतर्गत मुंबई शहर या जिल्ह्यात मुलांचे 2 व मुलींचे 1, मुंबई उपनगर या जिल्ह्यात मुलांचे 3 व मुलींचे 3, ठाणे जिल्ह्यात मुलांचे 4 व मुलींचे 4, पालघर जिल्ह्यात मुलांचे-1, रायगड जिल्ह्यात मुलांचे 3 व मुलींचे 4, रत्नागिरी जिल्ह्यात मुलांचे 6 व मुलींचे 4 व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुलांचे 3 व मुलींचे 5असे एकूण 41 शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. मुंबई विभागातील रायगड जिल्ह्यात जावळी, ता.माणगाव येथे शासकीय निवासी शाळा कार्यरत आहे.

समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविली जाते. वसतिगृह प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही, अशा विद्यार्थ्याकरिता ही योजना राबविली जाते.

तरी विद्यार्थ्यांनी लाभासाठी व अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, मुंबई विभाग, मुंबई श्रीम.वंदना कोचुरे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत