माणगांव तालुक्यातील जिल्हा परिषद गट क्र.45-निजामपूर व रोहा तालुक्यतील पंचायत समिती 80- आंबेवाडी निर्वाचक गण पोट निवडणूक कार्यक्रम
अलिबाग दि.19, जिल्ह्यतील माणगांव तालुक्यातील जिल्हा परिषद गट क्र.45-निजामपूर व रोहा तालुक्यतील पंचायत समिती 80- आंबेवाडी निर्वाचक गण पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर. निवडणूकीच्या तारखांची सूचना व निवडणूकीचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिध्दीची तारीख शुक्रवार दि.22 नोव्हेंबर, 2019, संकेतस्थळावर भरण्यांत आलेले नामनिर्देशन पत्र निर्वाचन अधिकाऱ्यांनी स्विकारण्याचा कालावधी शुक्रवार दि.22 नोव्हेंबर 2019 ते बुधवार दि.27 नोव्हेंबर 2019 पर्यंत (सकाळी 11.00 ते दु.3 पर्यंत) रविवार दि.24 नोव्हेंबर 2019 रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशन पत्रांची छाननी व त्यावर निर्णय देणे गुरुवार दि.28 नोव्हेंबर 2019 (सकाळी 11.00 वाजल्यापासून), वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यांचा दिनांक गुरुवार दि.28 नोव्हेंबर 2019 (छाननीनंतर लगेचच), नामनिर्देशन पत्राचा स्विकार करण्याबाबत किंवा ते नामंजूर करण्याबाबतचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांने दिलेल्या निर्णयाविरुध्द जिल्हा न्यायाधिशांकडे अपिल करण्याची शेवटची तारीख सोमवार दि.02 डिसेंबर 2019, जिल्हा न्यायाधिशांन...