ग्रामपरिवर्तकांनी सामान्य जनतेच्या जीवनमानात सुधारणा करणे महत्वाचे - जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी



अलिबाग दि.19, :- ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत  विविध कामांच्या माध्यमातून ग्राम परिवर्तकांनी सामान्य जनतेच्या जीवनमानात सुधारणा करणे अत्यंत महत्वाचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले.
जिल्हा ग्राम सामाजिक परिवर्तन अभियनांतर्गत 22 ग्रामपंचायतीमधील विकास कामांचा आढावा बैठक नियोजन भवन येथे झाली त्यावेळी डॉ.सूर्यवंशी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकरी दिलीप हळदे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव, ग्राम सामाजिक परिवर्तन  अभियानाचे व्यवस्थापक युवराज सासवडे, संबंधित तालुक्याचे गट विकास अधिकारी, 22 ग्रामपंचायती मधील ग्राम परिवर्तक व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
डॉ.सूर्यवंशी म्हणाले, ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून  ग्रामीण जनतेच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. जलयुक्त शिवार अभियान, शाळा दुरुस्ती, शाळा डिजिटल करणे, शौचालय बांधकाम दुरुस्ती, आरोग्य तपासणी, कुकट पालन, मस्त्य पालन, शेळी पालन, शेत तळे आदि विविध क्षेत्रात या अभियानांतर्गत कामे सुरु आहेत. परंतु अद्यापही काही कामे प्रलंबित आहेत. ती संबंधित विभागाचे अधिकारी व ग्राम परिवर्तक यांनी समन्वयाने लवकरात लवकर पूर्ण करावीत.  पुढील वर्षीच्या करावयाच्या कामांचा आराखडा लवकर सादर करण्याचे निर्देश ही यावेळी डॉ.सूर्यवंशी यांनी दिले.
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज