Posts

Showing posts from April 19, 2020

कोविड-19- करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! दि.01 मार्च ते 24 एप्रिल दरम्यान जिल्ह्यातील करोना संबंधी नागरिकांची माहिती जाहीर

वृत्त क्रमांक :- 226                                                                                        दिनांक :- 25 एप्रिल 2020 अलिबाग, जि. रायगड, दि.25 (जिमाका) : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 24 एप्रिल 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधी नागरिकांचा तपशिल कळविला आहे, तो पुढीलप्रमाणे-        जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या   (01/03/2020 ते 24/04/2020) - 1 हजार 589, परदेश प्रवासावरुन परतल्यानंतर निरीक्षणाखाली असलेल्या परंतु 14 दिवसांचा   incubetion कालावधी पूर्ण केलेल्या ना...

उद्योग राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना. कु. आदिती तटकरे यांच्याकडून रायगड जिल्ह्यात 10 ठिकाणी स्वॅब टेस्टिंग बूथची उभारणी

वृत्त क्रमांक :- 225                                                                                        दिनांक :- 25 एप्रिल 2020 अलिबाग, जि. रायगड, दि.25 (जिमाका) : करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे बाधित रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांची तपासणी करणे आवश्यक असून पीपीई कीट ची संख्या मर्यादित असल्यामुळे तपासणी करण्याबाबत मर्यादा आहेत. या विषाणूची लागण तपासणी करणाऱ्यांना होवू नये, याकरिता उद्योग राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री ना. कु. आदिती तटकरे यांच्या प्रयत्नातून एमआयडीसी असोसिएशनतर्फे जिल्ह्यात नवीन तंत्रज्...

जिल्ह्यात अंत्योदय व प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेंतर्गत 3 लाख 28 हजार 822 शिधापत्रिकाधारकांना प्रति व्यक्ती 5 किलो मोफत तांदूळ वितरित

अलिबाग, रायगड,दि.25 (जिमाका) - करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये, यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.     जिल्ह्यात माहे एप्रिलसाठी अंत्योदय अन्न योजनेंतर्गत एकूण 67 हजार 232 शिधापत्रिकाधारकांना आणि प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेंतर्गत एकूण 2 लाख 61 हजार 590 शिधापत्रिकाधारकांना प्रति व्यक्ती 5 किलो मोफत तांदळाचे वाटप करण्यात आले असून त्याची टक्केवारी 78.59 टक्के इतकी आहे. जास्त दराने वस्तूंची विक्री केल्यास होणार कारवाई             जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे. मात्र लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काळाबाजार व अतिरिक्त भाव वाढ, जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग, वैधमापन शास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश जिल...

लॉकडाऊनच्या काळात सहज-सुलभतेने नागरिकांना विविध सवलती मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा डिजिटल पुढाकार करील कमी e-pass...नागरिकांचा त्रास..!

अलिबाग, रायगड,दि.25 (जिमाका) - रायगड जिल्हा प्रशासनाने जिल्‍हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या पुढाकारातून e-pass नावाचे ॲप तयार केले असून त्याचा लाभ लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना विविध सवलती मिळण्यासाठी होणार आहे.   हे ॲप सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरमधून आपल्या मोबाईलवर इन्स्टॉल करावयाचे आहे.  त्यानंतर संबंधित व्यक्तीने स्वतःची  या ॲपमध्ये नोंदणी करावयाची आहे व त्यानंतर त्या व्यक्तीने ज्या कामाकरिता त्याला परवानगी हवी आहे, त्याचा अर्ज स्वरूपात ऑनलाइन फॉर्म भरावयाचा आहे.   यामध्ये मत्स्यव्यवसाय, वनविभाग, कृषी विभाग, वित्त विभाग, पशुसंवर्धन, वितरण सेवा, परिवहन सेवा, केबल सर्विसेस, उर्जा निर्मिती उर्जा वितरण, ऑईल अँड गॅस सेवा, वितरण अशा जनतेच्या दैनंदिन आयुष्याशी निगडित असलेल्या विविध विभागांचा समावेश आहे. नागरिकांना त्यांची ओळख पटवून देण्यासाठी त्यांचे ओळखपत्र म्हणून आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदार ओळखपत्र या ॲपवर अपलोड करावे लागेल.  ऑनलाइन फॉर्म सादर केल्यानंतर तो संबंधित विभागाकडे परवानगीकरिता लॉग इन केला जाईल.  संबंधि...

पनवेल तालुक्यातील मौजे भिंगारवाडी संपूर्ण गाव परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

                                      अलिबाग, जि. रायगड, दि.25 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील मौजे भिंगारवाडी, पो.आजिवली येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोनबाधित रुग्ण रहात असलेले मौजे भिंगारवाडी   हे संपूर्ण गाव व त्याच्या परिसर क्षेत्रामध्ये करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस हे क्षेत्र Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोल...

नागरिकांचे मानसिक स्वास्थ सांभाळण्यासाठी ‘मानसमैत्र’ सरसावले पुढे

                                               अलिबाग, जि. रायगड, दि.25 (जिमाका) : करोना विषाणूच्या संक्रमणामुळे संपूर्ण जग चिंताग्रस्त झाले आहे. भारतावरही परिणाम दिसून येत आहे. तसेच करोनामुळे अपरिहार्यपणे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन व जमावबंदीमुळे लोकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. याचा परिणाम लोकांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावरही   होत आहे. यापैकी शारीरिक आरोग्याबाबत शासन पातळीवरुन व इतर स्वयंसेवी संस्थांकडून चांगले प्रयत्न होत आहे.   मात्र मानसिक आरोग्याच्या बाबतीत असे प्रयत्न होणेदेखील   आवश्यक आहे.             संकटकाळात व्यक्तीचे मानसिक संतुलन   तर बिघडतेच पण समाजाचेही संतुलन बिघडून वेगवेगळ्या घटकांना एकत्रित बांधून ठेवण्याच्या क्षमतेवरही आघात होतो.   यातून सावरण्यासाठी नागरिकांना किमान मानसिक प्रथमोपचाराची गरज असते. यासाठी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मू...

प्रशासनाच्या संवेदनशीलता व तत्परतेमुळे टळली वारांगणांची होणारी उपासमार

अलिबाग, जि. रायगड, दि.25 (जिमाका) : वारांगणा हा घटक समाजातील अत्यंत दुर्लक्षित, उपेक्षित असा एक घटक आहे,ज्याच्याकडे सर्वसामान्य नागरिक जाण्यास धजावत नाही.   या महिला आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी शरीरविक्रय करुन लाजिरवाणे जीवन जगत आहेत. परंतु हा घटकसुध्दा या समाजव्यवस्थेमुळेच तयार झाला आहे, हे आपणाला मान्य करावेच लागेल.             करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्वत्र संचारबंदी लागू असल्याने समाजातील हा घटक मोठ्या संकटात सापडला आहे.   शासनाकडून सर्व कष्टकरी,मजूरवर्गीय जनतेला   विविध प्रकारच्या माध्यमातून मदत होत आहे.     ज्यांच्याकडे रेशनकार्ड,आधारकार्ड आहेत त्यांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळत आहे. परंतु या महिलांकडे या दोन्ही गोष्टी नसल्यामुळे त्या शासनाच्या या लाभापासून वंचित आहेत,त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती.             मात्र जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी ही बाब जिल्हाधिकारी श्रीमती निध...

रायगड जिल्ह्यात 19 जणांनी निक्षून सांगितले गो-करोना..गो..!

वृत्त क्रमांक :- 219                                                                                           दिनांक :- 24 एप्रिल 2020 अलिबाग, जि. रायगड, दि.24 (जिमाका) :- जिल्ह्यात मुंबई, परराज्य आणि परदेशातून आलेल्या नागरिकांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या काही व्यक्तींना करोनाची लागण झाली. आतापर्यंत जिल्ह्यात 64 जणांना करोना लागण झाली असून आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाच्या सतर्कतेमुळे 19 रुग्णांनी करोनाला हरवून माणसाची जगण्याची जिद्द सिद्ध केली आहे. या 19 करोनाबाधित रुग्णांना रुग्णालयातून बरे होऊन घरी पाठविण्यात आले आहे.   दुर्देवाने 2 जणां...

कोविड-19- करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! दि.01 मार्च ते 23 एप्रिल दरम्यान जिल्ह्यातील करोना संबंधी नागरिकांची माहिती जाहीर

वृत्त क्रमांक :- 218                                                                                           दिनांक :- 24 एप्रिल 2020 अलिबाग, जि. रायगड, दि.24 (जिमाका) : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 23 एप्रिल 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधी नागरिकांचा तपशिल कळविला आहे, तो पुढीलप्रमाणे-        जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या   (01/03/2020 ते 23/04/2020) - 1 हजार 589, परदेश प्रवासावरुन परतल्यानंतर निरीक्षणाखाली असलेल्या परंतु 14 दिवसांचा   incubetion कालावधी पूर्ण केलेल्या...

जिल्ह्यात 1 मार्च पासून 58 शिवभोजन केंद्रांमधून तब्बल 1 लाख 18 हजार 267 शिवभोजन थाळ्यांचे झाले वितरण गरजू लोकांच्या पोटाला दिला शिवभोजन थाळ्यांनी आधार

अलिबाग,दि.24 (जिमाका)- राज्यात स्वस्त दरात शासकीय अनुदान प्राप्त शिवभोजन केंद्रातून शिवभोजन थाळी उपलब्ध करुन देण्याची योजना राबविण्यात येत आहे. करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे देशात तसेच राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमुळे परराज्यातील तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्हयातील अनेक कामगार, मजूर हे रायगड जिल्हयातील पनवेल, खोपोली, खालापूर, उरण, कर्जत, पेण, अलिबाग इत्यादी भागात अडकून पडलेले आहेत. रोजगाराअभावी या लोकांवर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तसेच पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शिवभोजन केंद्रावरुन जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांच्या देखरेखीखाली जिल्ह्यात 1 मार्च पासून एकूण 58 शिवभोजन केंद्रांवरुन तब्बल 1 लाख 18 हजार 267   शिवभोजन थाळ्यांचे वितरण झाले आहे.             जिल्ह्यातील मंजूर शिवभोजन थाळ्यांची संख्या एकूण 11 हजार 150 आहे.   दि.1 मार्च 2020 ते 31 मार्च 2020 या कालावधीत जिल्ह्यात 7 हजार 131 शिवभोजन थाळ...

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई अवैध गावठी हातभट्टी साहित्यासह इको कार जप्त

अलिबाग, जि. रायगड, दि.24 (जिमाका) :- राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक पनवेल क्र.2 या विभागाच्या कारवाईत गुरुवार, दि.23 एप्रिल रोजी मौजे-1,संत जगनाडे चौक, पनवेल येथून अवैध गावठी हातभट्टीसाठी लागणारा गूळ वाहतूकीवर पाळत ठेवून इको कार क्र.एमएच 46 बीएम 2553 मधून गावठी हातभट्टी दारुसाठी लागणारे साहित्य गूळ, साखर,अवैधरित्या वाहतूक करत असताना जयवंत कृष्णा कडू,वय 59, वेश्वी गाव, दिघोडे व रोहन नामदेव कडू वय- 22 वर्षे, रा. वेश्वी कातकरवाडी दिघोडे ता.उरण   यांना इको कारसह गूळ -198 किलो व साखर-50 किलो सह ताब्यात घेण्यात आले.   चौकशीअंती त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मौजे वेश्वी गावाच्या जंगल भागात, घर   नं.501 च्या मागील बाजूस वेश्वी, ता.उरण हातभट्टी निर्मितीवर कारवाई करुन बिबवे -2 किलो, नवसागर-2 किलो तसेच रसायन 700 लिटर व गावठी दारु 108 लि.असा एकूण रु.5 लाख 48 हजार 290/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.   तसेच या गुन्ह्यात अशोक ठक्कर हा गूळ पुरवठा करणारा संशयित इसम असून त्याचा शोध सुरु आहे. या गुन्ह्याचा तपास अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क श्रीमती सीमा झावरे यांच्या मार्गद...
Image
Namaste! We cordially invite you to attend the *Live Webinar(Zoom+Facebook)* with - *Speaker*: *Nidhi Choudhari, IAS*, District Collector and District Magistrate, Raigad, Maharashtra *Topic*: Tackling Corona Crisis: Initiatives by Raigad District Administration *Moderator*: Dr. Ravi Gupta, Founder & CEO, Elets Technomedia Pvt Ltd *Date*: 26 April 2020 I Time: 10:00 AM (45 Minutes) To attend, *click* on the following link & *register now*:  https://elets.co.in/175.html (Download Zoom)

कोविड-19- करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! दि.01 मार्च ते 22 एप्रिल दरम्यान जिल्ह्यातील करोना संबंधी नागरिकांची माहिती जाहीर

वृत्त क्रमांक :- 215                                                                      दिनांक :- 23 एप्रिल 2020 अलिबाग, जि. रायगड, दि.23 (जिमाका) : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 22 एप्रिल 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधी नागरिकांचा तपशिल कळविला आहे, तो पुढीलप्रमाणे-        जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या   (01/03/2020 ते 22/04/2020) - 1 हजार 589, परदेश प्रवासावरुन परतल्यानंतर निरीक्षणाखाली असलेल्या परंतु 14 दिवसांचा   incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या - 1 हजार 589, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात निरीक्षणाखाली असलेल्या नागरिकांची संख्या-...

ओएनजीसीच्या वतीने गरजू व्यक्तींच्या अन्नधान्यांच्या मदतीसाठी, 20 लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री कु.आदिती तटकरे व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे सुपूर्द

Image
वृत्त क्रमांक :- 214                                                                                          दिनांक :- 23 एप्रिल 2020                                               अलिबाग,जि.रायगड.दि.23 (जिमाका )– पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या प्रयत्नातून करोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मदत...

जिल्ह्यातील कोणताही पात्र शिधापत्रिकाधारक अन्नधान्याच्या लाभापासून वंचित राहणार नाही -पालकमंत्री कु.आदिती तटकरे

Image
वृत्त क्रमांक :- 213                                                                                           दिनांक :- 23 एप्रिल 2020                                                        अलिबाग, जि. रायगड, दि.23 (जिमाका) : करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे देशात व राज्यात लॉकडाऊन सु...

फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने करोना उपाययोजनांविषयी साधला रायगडकरांशी सुसंवाद 536 लाईक्स, 120 शेअर्स आणि 8 हजार व्ह्यूज्

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.23 (जिमाका) : रायगड जिल्हा प्रशासनामार्फत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे प्रशासनातील या तीनही प्रमुखांनी जिल्ह्यातील जनतेशी आज जिल्हाधिकारी कार्यालयातून संवाद साधला.             सुरुवातीला जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी जिल्ह्यातील कोविड-19 ची सद्यस्थितीबाबतची माहिती दिली. करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या , प्रतिबंधात्मक कार्यवाहीबाबतची माहिती दिली. यावेळी जनतेने फेसबुकच्या माध्यमातून जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांना कोविड-19 बाबत विविध प्रश्न विचारले.   त्यामध्ये   स्थलांतरीत व्यक्तींच्या भोजन, निवारा व्यवस्था, अन्नधान्य पुरवठा, वैद्यकीय सेवा सुविधा, आरोग्य,   मुक्या प्राण्यांची   व्यवस्था,   सुरु असलेल्या कंपन्यामधील कर्मचाऱ्यांची व्यवस्था, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, शेती व्यवसाय,...

मुक्या जीवा..घास द्यावा... मानूनी मानवता धर्म…सत्कर्म करावा..!

         करोनाच्या संकटाने संपूर्ण जग ग्रासले आहे. करोनाच्या नियंत्रणाकरिता शासनाला देखील संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करावा लागला.          या अभूतपूर्व परिस्थितीत आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन, पोलीस, अग्निशमन, विद्युत विभाग, पाणीपुरवठा विभाग अन् सर्वच अत्यावश्यक सेवा पुरवणारे विभाग आपल्यास लागणाऱ्या सर्व आवश्यक वस्तू व सेवा पुरवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेतच. परंतु आपल्या व्यथा शब्दात मांडू न शकणाऱ्या मुक्या प्राण्यांसाठी पशुसंवर्धन खातेसुद्धा अहोरात्र झटत आहे. अहो, पाळीव प्राण्यांना वाली आहे.. पण भटक्या, रस्त्यावर मोकाट फिरून खाणं शोधणाऱ्या प्राण्यांचं काय? जिथे माणसाचीच आबाळ झाली, तिथे ह्या मुक्या जीवांचं काय? आमच्यासाठी कोण? हा प्रश्न ह्या निरागस जीवांच्या डोळ्यांत पाहायला मिळतो.         पशुपक्षी सुद्धा निसर्गाचा जीवसृष्टीचा अविभाज्य घटक आहे. त्यांचं अस्तित्व मानवजातीच्या प्रगतीसाठी जीवनासाठी आवश्यक आहे. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या संत तुकारामांच्या ...