राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई अवैध गावठी हातभट्टी साहित्यासह इको कार जप्त



अलिबाग, जि. रायगड, दि.24 (जिमाका) :- राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक पनवेल क्र.2 या विभागाच्या कारवाईत गुरुवार, दि.23 एप्रिल रोजी मौजे-1,संत जगनाडे चौक, पनवेल येथून अवैध गावठी हातभट्टीसाठी लागणारा गूळ वाहतूकीवर पाळत ठेवून इको कार क्र.एमएच 46 बीएम 2553 मधून गावठी हातभट्टी दारुसाठी लागणारे साहित्य गूळ, साखर,अवैधरित्या वाहतूक करत असताना जयवंत कृष्णा कडू,वय 59, वेश्वी गाव, दिघोडे व रोहन नामदेव कडू वय- 22 वर्षे, रा. वेश्वी कातकरवाडी दिघोडे ता.उरण  यांना इको कारसह गूळ -198 किलो व साखर-50 किलो सह ताब्यात घेण्यात आले.  
चौकशीअंती त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मौजे वेश्वी गावाच्या जंगल भागात, घर  नं.501 च्या मागील बाजूस वेश्वी, ता.उरण हातभट्टी निर्मितीवर कारवाई करुन बिबवे -2 किलो, नवसागर-2 किलो तसेच रसायन 700 लिटर व गावठी दारु 108 लि.असा एकूण रु.5 लाख 48 हजार 290/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.  तसेच या गुन्ह्यात अशोक ठक्कर हा गूळ पुरवठा करणारा संशयित इसम असून त्याचा शोध सुरु आहे.
या गुन्ह्याचा तपास अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क श्रीमती सीमा झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक शिवाजी गायकवाड हे करीत आहेत.
000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज