प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध - पालकमंत्री कु.आदिती तटकरे

अलिबाग, दि.22 (जिमाका):- पत्रकारांची पेन्शन, त्यांच्यावर होणारे हल्ले रोखण्यासाठी कठोर कायद्याची अंमलबजावणी आदी प्रश्न सोडविण्याचा शासनाच्या माध्यमातून निश्चित प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले. रायगड प्रेस क्लबच्या 16 वा वर्धापन दिन व पत्रकार सन्मान सोहळा रायगड प्रेस क्लब व माणगाव प्रेस क्लबच्या संयुक्त विद्यमाने माणगाव येथील कुणबी भवन येथे आयोजित केला होता, या प्रसंगी त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ माध्यमकर्मी व प्रमुख मार्गदर्शक समीरण वाळवेकर, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायगड प्रेस क्लबचे मार्गदर्शक एस.एम.देशमुख, मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, कोकण विभाग मराठी पत्रकार परिषद सचिव विजय मोकल, मेघराज जाधव, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर, माजी अध्यक्ष अनिल भोळे, अभय आपटे, मिलिंद अष्टीवकर आदी मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी श्री.देशमुख यांच्या मागणीचा संदर्भ देत पत्रकार पेन्शन योजनेसाठी 35 कोटींची तरतूद केली आहे त्याचबरोबर पत्रकार हल्ला विरोधी कायद्याच्या अंमलबजावणी स...