पेण उपजिल्हा रुग्णालय येथे आयुष्यमान आरोग्य मेळावा संपन्न
अलिबाग,दि.19 (जिमाका):- महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांतर्गत महाराष्ट्र शासन व केंद्र सरकार यांच्या सूचनेनुसार व जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पेण उपजिल्हा रुग्णालय येथे दि.18 एप्रिल 2022 रोजी आयुष्यमान आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या आरोग्य शिबिराचे उद्घाटन पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आरोग्य शिबिराकरिता जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी वंदन कुमार पाटील, तहसिलदार श्रीमती स्वप्नाली डोईफोडे आदी उपस्थित होते.
या आरोग्य शिबिराचा उच्च रक्तदाब व मधुमेह: 152, नेत्ररोग: 192, स्त्रियांचे आजार: 69, रक्त लघवी तपासणी: 139, फिजिशियन: 370, लहान मुलांचे: 17, दंत चिकित्सा: 10, नाक-कान-घसा: 35, अस्थिरोग: 25 अशा एकूण 692 रुग्णांनी लाभ घेतला.
या शिबिराचे आयोजन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजीव तांभाळे, गटविकास अधिकारी श्री.मांगु गढरी व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अपर्णा खेडेकर यांनी केले.
या आरोग्य शिबिरात फिजिशियन डॉ.श्रीकांत अफजलपुरकर, अस्थिरोग तज्ञ डॉ.वैभव ठाकूर, स्रीरोग तज्ञ डॉ.सोनाली शेट्टी, जनरल सर्जन डॉ.प्रेम कुमार जाधव, नाक कान घसा तज्ञ डॉ.युवराज पाटील या तज्ञ डॉक्टरांनी सेवा दिली.
हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मेहनत घेतली असून त्यांना तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
00000
Comments
Post a Comment