लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ कर्ज योजनांसाठी प्रस्ताव मागविले
अलिबाग,जि.रायगड दि.3 - (जिमाका) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) तर्फे मातंग समाजातील व पोटजातीतील लोकांकरिता उद्योग व्यवसाय स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करुन देत असते. त्यात मातंग समाजातील मांग,मातंग, मीनी-मादीग, मादींग, दानखाणी, दानखाणी मांग, माग महाशी, मदारी,राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या 12 या पोटजातींचा समावेश आहे. या जातीतील वय 18 वर्षे ते 50 वर्षे वयोगटातील इच्छुक व्यक्तींकडून कर्ज प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. यात बँकेकडून मंजूर अनुदान योजनेतून 50 हजार रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेसाठी जिल्ह्याला 60 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट आहे. तर बीज भांडवल योजनेअंतर्गत पन्नास हजार ते सात लाख रुपयांपर्यंतचे उद्दिष्ट आहे. तरी इच्छुक अर्जदारांनी आपला कर्ज प्रस्ताव आवश्यक त्या दस्तऐवजासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, विकास महामंडळ (मर्या), डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्यायभवन, मराठी शाळेच्या मागे गोंधळपाडा अलिबाग जि.रायगड येथे संपर्क ...