33 कोटी वृक्ष लागवड अभियान : लावलेल्या झाडाचे संगोपन हे प्रत्येकाचे कर्तव्य --जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी


             अलिबाग, जि. रायगड, दि.1 (जिमाका)- शासनाच्या हरित महाराष्ट्र चळवळी अंतर्गत  यावर्षी  राज्यात सर्वत्र आज एकाच दिवशी 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न होत आहे.  त्यासाठी  लावलेले झाड हे माझे आहे या भावनेने त्याचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे, प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी  यांनी आज अलिबाग तालुक्यातील वावे येथे केले.
         33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत अलिबाग तालुक्यातील वावे येथील परिसरात वृक्ष लागवड कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वृक्ष लागवड  करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपवनसरंक्षक अलिबाग मनिष  कुमार, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, उपविभागीय अधिकारी अलिबाग श्रीम.शारदा पोवार, तहसिलदार अलिबाग सचिन शेजळ, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी ए.एस. निकत  यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
                 जिल्हाधिकारी डॉ.सुर्यवंशी पुढे म्हणाले की, वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था यांच्या मार्फत वृक्ष लागवड करण्यात येत आहे. आज सकाळपासूनच या कार्यक्रमास सर्व यंत्राणांमार्फत सुरुवात झाली आहे.  शासनाचा हा महत्वाकांक्षी उपक्रम असून यात सर्वांचे सहकार्य महत्वाचे आहे.  लागवडीचे संवर्धनही तितकेच महत्वाचे आहे. आपण आपल्या मुलांना संपत्ती देण्याचा विचार करतो त्याचप्रमाणे आपल्या पुढच्या पिढीला आरोग्यदायी वातावरण देणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणून प्रत्येकाने वृक्ष संवर्धनाचे काम करावे असे आवाहनही  त्यांनी यावेळी केले.
           प्रारंभी भक्तीगीत व गणेशाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, उपवनसरंक्षक अलिबाग मनिष  कुमार, उपविभागीय अधिकारी अलिबाग  श्रीम.शारदा पोवार, आदींनी वृक्ष लागवड करुन या कार्यक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच वावे परिसरात  असलेल्या गावातील सरपंच, उपसरपंच, नागरिक आणि शाळेतील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज