खरवई गावातील शेतकरी व नागरिकांना ई-पीक पाहणीबाबत मार्गदर्शन

अलिबाग,दि.16 (जिमाका):- खालापूर तालुका महसूल विभाग आणि कृषी विभाग यांच्या वतीने ई-पीक पाहणीबाबत खरवई गावातील शेतकरी व नागरिकांना मार्गदर्शन तसेच ई-पीक पाहणीचे प्रशिक्षणही देण्यात आले. यावेळी भारतीय कृषी विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत उपस्थितांना माहिती दिली. यावेळी तलाठी प्रतीक बापर्डेकर, कृषी सहाय्यक मंजुषा शिंदे, भारतीय कृषी विमा कंपनी खालापूर तालुका प्रतिनीधी गणेश सावंत, पंकज साखरे, कोतवाल सुरेश ठोंबरे या सर्वांनी उपस्थित शेतकरी व नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी खरवई गावातील शेतकरी व नागरिक उपस्थित होते. 00000