तृतीयपंथियांनी नोंदणी करून ओळखपत्र मिळविण्याकरिता समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा -सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव

 


 

अलिबाग,दि.16 (जिमाका):- जिल्ह्यातील तृतीयपंथियांच्या समस्यांच्या/तक्रारी संदर्भात जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्यानुसार तृतीयपंथियांना सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयामार्फत ओळखपत्र देण्यात येणार आहे.

या ओळखपत्रासाठी तृतीयपंथीय व्यक्तींनी www.transgender.dosje.gov.in या पोर्टलवर तात्काळ नोंदणी करावी. तसेच तृतीयपंथीय व्यक्तींनी आपल्या काही तक्रारी असल्यास सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड, कच्छी भवन, नमिनाथ मंदिराजवळ, सेंट मेरी स्कूल समोरील श्रीबाग रोड, अलिबाग येथे संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन