Posts

Showing posts from April 19, 2026

आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवावा --जिल्हाधिकारी किशन जावळे

Image
    रायगड अलिबाग,(जिमाका)दि,22 :-  रायगड जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता मान्सून काळात येणाऱ्या पाऊस, पूर, वीज तसेच अन्य आपत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्व यंत्रणांचा समन्वय  आवश्यक आहे. आपत्ती काळात सर्व यंत्रणानी सतर्क व दक्ष रहावे, तसेच मान्सून पूर्व तयारी करताना सर्व बाबींची काटेकोरपणे तपासणी आणि उपाययोजना करावी असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. नियोजन भवन येथे जिल्हास्तरीय मान्सून पूर्व तयारी आढावा बैठक 2026 चे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी जिल्हाधिकारी  श्री.जावळे बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, भारतीय तटरक्षक दलाचे अभिषेक कुमार, आपत्ती व्यवस्थापन अधिकार सागर पाठक  उपस्थित होते.  जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले, पावसाळा सुरु होण्याकरिता एक महिन्याचा कालावधी बाकी असून सर्व शासकीय यंत्रणानी अतिधोकादायक व धोक्याची संभावना असलेल्या ठिकाणांची पाहणी करावी. या ठिकाणच्या नागरिकांना मान्सून कालावधीमध्ये सुरक्षित जागी स...

पनवेल येथे दुचाकी वाहनांसाठी MH46DH ही नवीन मालिका पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज सादर करावेत

  रायगड अलिबाग,(जिमाका) दि,21:-  प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल येथे दुचाकी वाहनांसाठी MH46DH ही नवीन मालिका सुरु करण्यात येणार आहे. यासाठी ज्यांना दुचाकी वाहनांकरिता आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरुन हवे असतील त्यांनी दि.23 एप्रिल 2026 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 10.00 ते दुपारी 2.30 या दरम्यान विहित नमुन्यातील अर्जामध्ये कार्यालयाच्या खाजगी वाहन विभागात डीडी, निवासी पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करावा, असे आवाहन सहायक प्रादेशिक परिहवन अधिकारी पनवेल यांनी केले आहे. एकाच नंबरकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दि.23 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 4.00 वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. त्यानुसार एकाच नंबरसाठी एकापेक्षा जास्त अर्ज असतील तर त्या अर्जदारांनी त्याची नोंद घेऊन दि. 24 एप्रिल 2026 रोजी कार्यालयीन वेळेत दुपारी 2.30 वाजेपूर्वी त्यांच्या इच्छेप्रमाणे जास्तीच्या रक्कमेचा धनाकर्ष (DD) बंद लिफाफ्यामध्ये कार्यालयात जमा करावा. या  अर्जासाठी त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजता सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, नवीन...

गांधी शांती परिक्षेत जिल्हा कारागृहातील 23 महिला व पुरुष बंद्यांचा सहभाग

Image
  रायगड अलिबाग,(जिमाका) दि,21:-  अलिबाग जिल्हा कारागृहात दाखल बंद्यांमध्ये नैतिक मुल्यांचा विकास आणि हिंसामुक्त समाज घडविण्यासाठी मुंबई सर्वोदय मंडळ, मुंबई या सामाजिक संस्थेच्या वतीने कारागृहातील बंद्यांकरीता आयोजित करण्यात आलेल्या गांधी शांती परिक्षेत जिल्हा कारागृहातील 23 महिला व पुरुष बंद्यांनी सहभाग घेतला असल्याची माहिती   जिल्हा कारागृह अधीक्षक विशाल बाळासाहेब बांदल यांनी दिली आहे. संस्थेचे स्वयंसेवक प्रेमशंकर तिवारी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शांततापूर्ण जगाची निर्मिती करण्यासाठी तसेच भावी पिढीसाठी बंद्यांमध्ये प्रेम, बंधुत्व, मैत्रीभाव, सहिष्णुता, सेवाभाव, सत्य, अहिंसा आणि शांततेचे बिज रुजवुन शांतिमय जिवन जगण्याकरीता बंद्यांना प्रवृत्त करण्यासाठी गांधी शांती परिक्षेचे आयोजन करीत असल्याचे सांगितले. तसेच महात्मा गांधीजींची आत्मकथा वाचून बंद्यांचे हृदय परिवर्तन व्हावे, त्यांना भावी जीवन जगण्याची प्रेरणा मिळावी व बंद्यांनी सत्य व अहिंसेच्या मार्गावर जावून त्यांचे विचार परिवर्तन होण्यास मदत करण्याच्या उद्देशाने या संस्थेमार्फत कारागृह ग्रंथालयात बंद्यां...

युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटी, कुशिवली,कर्जत येथे राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न

Image
रायगड अलिबाग,(जिमाका) दि,20:-   उद्योग संचालनालय, मार्फत विभागीय अधिकारी, महाव्यवस्थापक यांची दि.17 ते 19 एप्रिल, 2026 दरम्यान तीन दिवसीय राज्य स्तरीय परिषद  युनिव्हर्सल एआय युनिर्व्हसिटी, कुशिवली,कर्जत जि. रायगड  येथे संपन्न झाली.  यावेळी विभागीय अधिकारी ,  महाव्यवस्थापक यांची राज्य स्तरीय परिषद-2026 करीता राज्याचे  विकास आयुक्त (उद्योग) दिपेंद्रसिंह कुशवाह ,( भाप्रसे) ,  अतिरिक्त विकास आयुक्त (उद्येाग) वैभव वाघमारे(भाप्रसे) ,  अतिरिक्त उद्योग संचालक ,  बाळासाहेब यशवंते यांच्यासह महाराष्ट्रातील उद्योग विभागाचे सर्व विभागीय उद्योग सह संचालक ,  सर्व जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक  जी.एस. हरळया उपस्थित होते. उद्येाग संचालनालयाद्वारे राज्यात उद्योग व स्वंयम रोजगाराकरिता अनेक महत्वपूर्ण योजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. तसेच शासनाच्या विकासात्मक योजनासाठी व राज्याच्या एकूण औद्योगिक विकासासाठी  राज्याचे उद्योग,गुंतवणूक व सेवा धोरण-2025 जाहीर झालेले आहे. या परिषदेत राज्याचे औद्योगिक गुंतवणूक ,  सेवा उद्योग धोरण-20...