युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटी, कुशिवली,कर्जत येथे राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न



रायगड अलिबाग,(जिमाका) दि,20:-  उद्योग संचालनालय, मार्फत विभागीय अधिकारी, महाव्यवस्थापक यांची दि.17 ते 19 एप्रिल, 2026 दरम्यान तीन दिवसीय राज्य स्तरीय परिषद युनिव्हर्सल एआय युनिर्व्हसिटी, कुशिवली,कर्जत जि. रायगड येथे संपन्न झाली. 

यावेळी विभागीय अधिकारीमहाव्यवस्थापक यांची राज्य स्तरीय परिषद-2026 करीता राज्याचे  विकास आयुक्त (उद्योग) दिपेंद्रसिंह कुशवाह,(भाप्रसे)अतिरिक्त विकास आयुक्त (उद्येाग) वैभव वाघमारे(भाप्रसे)अतिरिक्त उद्योग संचालकबाळासाहेब यशवंते यांच्यासह महाराष्ट्रातील उद्योग विभागाचे सर्व विभागीय उद्योग सह संचालकसर्व जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक  जी.एस. हरळया उपस्थित होते.

उद्येाग संचालनालयाद्वारे राज्यात उद्योग व स्वंयम रोजगाराकरिता अनेक महत्वपूर्ण योजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. तसेच शासनाच्या विकासात्मक योजनासाठी व राज्याच्या एकूण औद्योगिक विकासासाठी  राज्याचे उद्योग,गुंतवणूक व सेवा धोरण-2025 जाहीर झालेले आहे.

या परिषदेत राज्याचे औद्योगिक गुंतवणूकसेवा उद्योग धोरण-2025माहिती तंत्रज्ञान धोरण, Ease of Doing Busines (EODB),मैत्री इ. विषयांवर सादरीकरण करण्यात आले. उद्योग विभागातील  सर्व अधिका-याकरीता Artificial Intelligence (AI) चा प्रशासकीय कामात वापर यावर ए‍क दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

            उद्येाग सह संचालककोकण विभागठाणे  संदिप पाटील यांनी राज्यस्तरीय परिषदेस उपस्थित सर्व                अधिकाऱ्यांचे  आभार व्यक्त केले.

000000

Comments