Posts

Showing posts from June 16, 2019

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 5 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.23 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 5.14 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 161.86 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 0.00 मि.मि., पेण-13.20 मि.मि., मुरुड-0.00 मि.मि., पनवेल-0.40 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-0.00 मि.मि., खालापूर-0.00 मि.मि., माणगांव-0.00 मि.मि., रोहा-13.00 मि.मि., सुधागड-2.00 मि.मि., तळा-22.00 मि.मि., महाड-13.00मि.मि., पोलादपूर-15.00, म्हसळा-0.00मि.मि., श्रीवर्धन-3.00 मि.मि., माथेरान-0.60 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 82.20 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 5.14 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   5.31 टक्के इतकी आहे. 0000

निरोगी जीवनासाठी योगा उपयुक्त---- जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21-   निरोगी जीवनासाठी योगा उपयुक्त असून त्यामुळे   ताण-तणाव दूर होऊन मानसिक संतुलन कायम राखण्यासही मदत होते. त्यासाठी सर्वांनी   नियमित योगासने करावीत,   असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी आज येथे केले. संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. त्यानिमित्त आज पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन   जिल्हयात योग प्रशिक्षण प्रात्यक्षिक घेऊन साजरा करण्यात आला.     जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा पोलीस विभाग व पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्य कार्यक्रम पोलीस परेड मैदान, पोलीस मुख्यालय अलिबाग येथे आयोजित करण्यात आला होता.            यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्यश्री बैनाडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, उपविभागीय अधिकारी अलिबाग श्रीमती शारदा पोवार, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) ...

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 7 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.20 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 7.64 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 156.66 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 0.00 मि.मि., पेण-9.00 मि.मि., मुरुड-2.00 मि.मि., पनवेल-0.60 मि.मि., उरण-2.00 मि.मि., कर्जत-0.00 मि.मि., खालापूर-9.00 मि.मि., माणगांव-6.00 मि.मि., रोहा-8.00 मि.मि., सुधागड-2.00 मि.मि., तळा-6.00 मि.मि., महाड-16.00मि.मि., पोलादपूर-21.00, म्हसळा-14.00मि.मि., श्रीवर्धन-25.00 मि.मि., माथेरान-1.70 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 122.30 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 7.64 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   5.15 टक्के इतकी आहे. 0000

पनवेल येथे उद्या रोजगार मेळावा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.20 -    उद्योग विभाग यांच्या पुढाकाराने   शनिवार दि.22 जून रोजी पिल्लई कॉलेज ऑफ   इंजिनिअरिंग नवीन पनवेल येथे बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.   या मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रायगड ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.    तर मेळाव्यासाठी उद्योग व खनिकर्म, अल्पसंख्याक विकास व वक्फ, राज्यमंत्री अतुल सावे, खासदार श्रीरंग बारणे यांची उपस्थिती राहणार असून   विशेष अतिथी   म्हणून सिडकोचे अध्यक्ष   आ.प्रशांत ठाकूर, आ.मनोहर भोईर   हे उपस्थित राहणार आहेत. गरजु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उद्योग सहसंचालक, कोकण विभाग उद्योग संचालनालय यांनी केले आहे. 00000

प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रम ऑनलाईन प्रवेशासाठी दि. 24 पर्यंत मुदतवाढ

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19 - महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण ) पुणे यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष 2019-20 साठी प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रम (D.EI.ED)   प्रथम वर्ष ऑनलाईन (शासकीय कोटा) प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दि.17 जून रोजी पर्यंत मुदत ठेवण्यात आली होती.   सदर अर्ज भरण्यासाठी आता सोमवार दि.24 जून रोजी सायं. सहा वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.   याबाबतच्या सर्व सूचना,प्रवेश पात्रता इत्यादी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) च्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच ऑनलाईन अर्ज भरल्यानंतरचे फेरीनिहाय सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध असेल.    यासाठी संबंधितांनी वेळोवेळी संकेतस्थळ पहावे, असे अध्यक्ष राज्यस्तरीय डी.एल.एङप्रवेश निवड,निर्णय व प्रवेश सनियंत्रण समिती तथा संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे यांनी कळविले आहे. 00000

ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकीकरिता स्थानिक सुट्टी जाहीर

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19 -   जुलै ते सप्टेंबर 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित   झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता तसेच थेट निवडणुकीद्वारे भरण्यात यावयाच्या रिक्त सरपंच पदासह रिक्त सदस्य पदांच्या पोट निवडणुकीकरिता निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे.   त्यानुसार जिल्ह्यातील अलिबाग,पेण,पनवेल,उरण, खालापूर,रोहा,सुधागड,माणगाव,पोलादपूर,श्रीवर्धन तालुक्यातील सार्वत्रिक 8 व पोटनिवडणुक 13 करिता रविवार 23 जून रोजी मतदार होणार आहे.   याकरिता सदर दिवशी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, असे तहसिलदार (सर्वसाधारण)   रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे. 00000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 22 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 22.53 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 149.02 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 43.00 मि.मि., पेण-34.20 मि.मि., मुरुड-34.00 मि.मि., पनवेल-40.40 मि.मि., उरण-17.00 मि.मि., कर्जत-13.00 मि.मि., खालापूर-10.00 मि.मि., माणगांव-16.00 मि.मि., रोहा-28.00 मि.मि., सुधागड-9.00 मि.मि., तळा-24.00 मि.मि., महाड-2.80मि.मि., पोलादपूर-7.00, म्हसळा-23.00मि.मि., श्रीवर्धन-16.00 मि.मि., माथेरान-43.10 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 360.50 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 22.53 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   4.74 टक्के इतकी आहे. 0000

मोटार वाहन निरिक्षक यांचा तालुकानिहाय शिबीर कार्यक्रम

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19 -उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण जि. रायगड यांच्या कार्यालयातील मोटार वाहन निरिक्षक यांचा जुलै  ते डिसेंबर 2019 या कालावधीतील दौरा  तसेच तालुका व महिना निहाय शिबीर कार्यक्रम पुढीलप्रमाणे. रोहा - मंगळवार दि.09 जुलै,  बुधवार दि.07 ऑगस्ट, बुधवार दि.11 सप्टेंबर , बुधवार दि.09 ऑक्टोबर , बुधवार दि.06 नोव्हेंबर, बुधवार दि.11 डिसेंबर.   मुरुड - बुधवार दि.10 जुलै, गुरुवार दि. 08 ऑगस्ट, गुरुवार दि.12 सप्टेंबर,गुरुवार दि.10 ऑक्टोबर, गुरुवार दि.07 नोव्हेंबर, गुरुवार दि.12 डिसेंबर.  अलिबाग- गुरुवार दि.11 व शुक्रवार दि.26 जुलै, रोजी, शुक्रवार दि.09 व सोमवार दि. 26 ऑगस्ट, शुक्रवार दि.13 व गुरुवार 26 सप्टेंबर, शुक्रवार  दि.11 व शुक्रवार दि.25 ऑक्टोबर, शुक्रवार दि.08 व मंगळवार दि.26 नोव्हेंबर, शुक्रवार दि.13 व गुरुवार दि.26 डिसेंबर.    महाड- सोमवार दि.08 व बुधवार दि.24 जुलै, रोजी, मंगळवार दि.06 व मंगळवार दि. 20 ऑगस्ट, सोमवार दि.09 व मंगळवार 24 सप्टेंबर, सोमवार  दि.07 व सोमवार दि.21 ऑक्टोबर, मंगळवार दि.05 व मंगळवार दि.19...

आनंदाने साजरा झाला शाळा प्रवेशोत्सव

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.17-   बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 ची प्रभावी अंमलबजावणी करून 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना शालेय प्रवाहात आणण्यासाठी   दिनांक 17 जून   ते 2 जुलै 2019 या कालावधीत शाळा प्रवेशोत्सव हा उपक्रम साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव आनंदाने साजरा झाला. यावेळी प्रवेश पात्र बालकांच्या याद्या ग्राम पंचायत व शाळा फलकावर प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. प्रवेश पात्र बालकांची यादी ध्वनीक्षेपकावर घोषित करून शैक्षणिक पदयात्रा व शिक्षकांच्या गृहभेटी व सरपंच, गावकरी, व्यवस्थापन समिती सदस्य, युवक, बचत गट, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांच्या गृहभेटींचे नियोजन करण्यात आले होते. शाळेचा परिसर गावकऱ्यांच्या सहाय्याने स्वच्छ करून सडा रांगोळी व पाना फुलांनी सुशोभित करण्यात आला होता.             शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व शिक्षक शाळेत उपस्थित होते. बालकांची प्रभातफेरी काढण्यात आली असून पुस्तक दिन साजरा करण्यात आला. एकही विद्यार्थी श...

रेवदंडा खाडी पुलावरील अति अवजड वाहनांची वाहतूक आता रोहा चणेरा मार्गे

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.17 -    अलिबागकडून साळावकडे व साळावकडून अलिबागकडे रेवदंडा खाडी पुलावरुन होत असलेली अति अवजड वाहनांची   (Mulit Axle Veichles, Overload Two Axle Veichle) वाहतूक बंद करुन सदर वाहतूक राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरुन रोहा चणेरा मार्गे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी दिले आहेत.             सदर आदेशान्वये अलिबागकडून साळावकडे व साळावकडून अलिबागकडे वाहनांना विहित भार वाहन क्षमतेच्या अधिन राहून (Permitted Load Carring Capacity Of   Veichle For Mulit Axle Veichles & Two Axle Veichle) रात्री 9 ते सकाळी सहा वाजेपर्यंत वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे.             रेवदंडा खाडीपुल अवजड वाहतुकीसाठी सक्षम नाही.   तसेच   वाहनांच्या विहित भार वाहन क्षमतेसंदर्भातील बाबींचे पालन होत नसल्याने रेवदंडा खाडीवरील पुलास धोका संभवत असल्याचे कार्यकारी अभियंता, सा.बा.विभाग अलिबाग यांनी कळविले आहे.   त्यामुळे अ...

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 10 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.17 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 10.18 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 121.80 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 4.00 मि.मि., पेण-5.00 मि.मि., मुरुड-5.00 मि.मि., पनवेल-11.10 मि.मि., उरण-13.00 मि.मि., कर्जत-0.00 मि.मि., खालापूर-5.00 मि.मि., माणगांव-24.00 मि.मि., रोहा-16.00 मि.मि., सुधागड-2.00 मि.मि., तळा-9.00 मि.मि., महाड-0.00मि.मि., पोलादपूर-3.00, म्हसळा-50.00मि.मि., श्रीवर्धन-10.00 मि.मि., माथेरान-5.80 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 162.90 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 10.18 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   3.88 टक्के इतकी आहे. 0000

लोकसभा निवडणुक-2019 लेखा पुनर्मेळ अंतिम बैठक आज (दि.18)

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.17 -    लोकसभा निवडणुक 2019 च्या अनुषंगाने खर्च निरिक्षक निलंककुमार यांच्या उपस्थितीत मंगळवार दि.18 रोजी लेखा पुनर्मेळ अंतिम बैठक आयोजित करण्यात आली आहे.   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे.   लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 78 अन्वये प्रत्येक उमेदवाराने निकाल जाहीर झाल्यापासून तीस (30) दिवसांच्या आत लेखे सादर करणे आवश्यक आहे.   तसेच 6 (क) व (ख) अन्वये उमेदवाराने मूळ प्रमाणकासह खर्चाची नोंदवही, देयके व प्रमाणके आधारभूत शपथपत्रे तसेच संक्षिप्त विवरणपत्रासह आवश्यक दस्तऐवजांसह उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी केले आहे. 000000