Posts

Showing posts from January 26, 2020

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा सर्व माजी सैनिकांना लाभ

अलिबाग-दि. 31(जिमाका):- केंद्र शासनाकडून राबविली जाणारी पंतप्रधान सुरक्षा विमा योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व माजी सैनिक व त्यांच्यावर अवलंबून असणा - या अवलंबितांना लागू करण्या त आला आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाकडून पंतप्रधान सुरक्षा विमा योजने अंतर्गत वार्षिक रुपये 12/- + ( सेवाकर ) हप्ता असून तो दरवर्षी लाभार्थ्याच्या बँक खात्यातून आपोआप वर्ग होणार आहे . सदरची रक्कम रूपये 12/- + ( सेवाकर ) ही   केंद्रशासनाकडून लाभार्थ्याच्या खात्या मध्ये वर्ग करण्यात येणार आहे. तरी सर्व माजी सैनिक व त्यांच्या अवलंबितांना कळविण्यात येते कि , आपल्या   पेन्शन आकौंटच्या पहिल्या पानाची सुस्प्ष्ट छायांकित प्रत, खाते क्रमांक , आय. एफ. सी. कोड व   माजी सैनिक ओळखपत्रासह या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी   रायगड - अलिबाग यांच्या कार्यालयात जमा करावी असे अवाहन ,   जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी   रायगड - अलिबाग यांनी केले आहे . 000

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार 5 फेब्रुवारी 2020 पर्यंत अर्ज सादर करावेत

            अलिबाग-दि. 31(जिमाका):- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत सन 2018-19 या वर्षासाठीच्या शिवछत्रपती राज्यक्रीडा पुरस्कार प्रदान करण्याची योजना कार्यान्वित आहे. यामध्ये शिवछत्रपती राज्यक्रीडा जीवन गौर व पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अंतर्गत उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, जिजामाता राज्यक्रीडा पुरस्कार (महिलाक्रीडामार्गदर्शक), राज्यक्रीडा साहसी पुरस्कार,   शिवछत्रपती राज्यक्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्यक्रीडा पुरस्कार (खेळाडूखेळाडू) असे विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.             या पुरस्कारासाठी ऑनलाईन व ऑफ लाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्यात येतील. संबंधितांनी ऑनलाईन अर्जामध्ये आपल्या कामगिरीचा तपशिलासह www.mumbaidivsports.com या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेल्या link वर अर्ज व संबंधित माहिती सादर करावी. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची एक प्रत स्वयंस्वाक्षांकित प्रमाणपत्रांसह   तसेच ऑफलाईनद्वारे अर्ज सादर करणा-या अर्जदारा...

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना लाभ घेण्यासाठी संपर्क साधावा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.31- केंद्र शासनाकडून राबविली जाणारी पंतप्रधान सुरक्षा विमा योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व माजी सैनिक व त्यांच्यावर अवलंबून असणा - या अवलंबितांना लागू करण्याचे महाराष्ट्र शासनाकडून प्रस्तावित आहे .   पंतप्रधान सुरक्षा विमा योजने अंतर्गत वार्षिक रुपये 12/- + ( सेवाकर ) हप्ता असून तो दरवर्षी लाभार्थ्याच्या बँक खात्यातून आपोआप वर्ग होणार आहे .     सदरची रक्कम रूपये 12/- + ( सेवाकर ) ही   केंद्रशासनाकडून लाभार्थ्याच्या खात्यामध्ये वर्ग करण्याचे संभावित असून , सर्व माजी सैनिक व त्यांच्या अवलंबितांनी आपल्या   पेन्शन आकौंटच्या पहिल्या पानाची सुस्प्ष्ट छायांकित प्रत खाते क्रमांक , आय एफ सी कोड व   माजी सैनिक ओळखपत्रासह या कार्यालयात जमा करावी असे आवाहन ,   जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,   रायगड - अलिबाग यांनी केले आहे . 000000

रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभाग व जिल्हा विज्ञान व गणित अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हाळ येथे रायगड जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

अलिबाग-दि. 28(जिमाका:- सन 2019-20 या शैक्षणिक वर्षाचे रायगड जिल्ह्याचे 45 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन तसेच   विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान असा आहे.   रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभाग, रायगड अलिबाग व जिल्हा विज्ञान व गणित अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त   विद्यमाने याक पब्लिक हायस्कुल, हाळ, खोपोली, ता. खालापूर जिल्हा रायगड येथे शुक्रवार दि.31 जानेवारी 2020 ते 2 फेब्रुवारी 2020 रोजी या कालावधीत संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक 31 जानेवारी 2020 रोजी सकाळी अकरा वाजता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कु.आदिती तटकरे, राज्यमंत्री, उद्योग,खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन,क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, तसेच माहिती व जनसंपर्क महाराष्ट्र राज्य रायगड जिल्हा पालकमंत्री यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न होणार आहे. तर रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा कु. योगिता पारधी यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. या कार्यक्रमास विशेष   अतिथी-   लोकसभा सदस्य   खा. श्रीरंग बारणे,खा. सुनिल तटकरे, विधान परिषद सदस्य आम. ...

निवृत्तीवेतनधारक व कुटूंब निवृत्तीवेतनधारकांचा फरक लवकरच अदा रायगड जिल्हा कोषागार कार्यालयाचे आवाहन

                                             अलिबाग-दि. 28(जिमाका:- डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून अलिबाग शहरातील बी.एस.एन.एल. (BSNL) इंटरनेटची सेवा विस्कळीत झाली आहे. बरेच वेळा ती बंद असल्यामुळे या कार्यालयातील निवृत्तीवेतन शाखेतील निवृत्तीवेतन देयक संगणक प्रणालीतून तयार करण्याचे कामही विस्कळीत झालेले आहे.   याबाबत बी.एस.एन.एल. (BSNL)कार्यालयाकडे चौकशी केली असता पेण- खोपोली महामार्गाच्या रुंदीकरण कामामुळे ओ.एफ.सी. ही मुख्य केबल सारखी तुटत असल्यामुळे ही समस्या निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले. इंटरनेट सुविधा विस्कळीत असल्याने देयके तयार करणे, लेखा शाखेमध्ये ती तपासून ऑनलाईन सी.एम.पी. तयार करणे यामध्ये अडचणी येत आहेत. तसेच देयके मंजूर करुन सी.एम.पी. केल्यानंतरही काही निवृत्तीवेतन धारकांच्या बँक खात्यामध्येही रकमा जमा होताना अडचणी येत आहेत. तसेच MDC पेन्शन यांच्याकडून संचलनालय लेखा व कोषागारे महाराष्ट्र राज्य मुंबई यांना प्राप्त झालेल्या ई-मेल संदेशा...

शिवभोजन थाळी उपक्रमाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभरंभ

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 26 -      राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क   राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री    ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते शिवभोजन आहार योजनेचा शुभांरभ सुरभी भोजनालय अलिबाग येथे आज झाला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष योगिता पारधी, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, जिल्हा नियोजन अधिकरी सुनिल जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके आदि मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले की, गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात भोजन मिळावे यासाठी शासनाने शिवभोजन आहार योजना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग येथे 2 व पनवेल येथे 2   अशा 4 ठिकाणी नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. दुपारी 12.00 ते 02.00 या वेळेत भोजन उपलब्ध होणार असून या शिवभोजन थाळीची किंमत फक्त रु. 10/- प्रती थाळी राहणार आहे. गरीब, गरजू, सर्वसामान्य व्यक्तींची भूक शमविण्याचे काम या योजने...

प्रजासत्ताक दिन वर्धापन दिनाचा दिमाखदार सोहळा, शेतकरी, कामगार, कष्टकऱ्यांच्या विकासासाठी शासन कटीबद्ध- ना. आदिती तटकरे

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 26 -    समाजातील शेतकरी, कामगार, कष्टकरी यांच्यासह सर्व घटकांच्या विकासासाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवित असून या सर्व घटकांच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन   राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क   राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री    ना. आदिती तटकरे यांनी आज येथे केले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनाचा रायगड जिल्ह्यातील मुख्य शासकीय समारंभ अलिबाग येथील पोलीस कवायत मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला. या दिमाखदार सोहळ्यात जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. या समारंभास जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष योगिता पारधी, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी ड...