पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा सर्व माजी सैनिकांना लाभ



अलिबाग-दि.31(जिमाका):- केंद्र शासनाकडून राबविली जाणारी पंतप्रधान सुरक्षा विमा योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व माजी सैनिक व त्यांच्यावर अवलंबून असणा-या अवलंबितांना लागू करण्यात आला आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाकडून पंतप्रधान सुरक्षा विमा योजने अंतर्गत वार्षिक रुपये 12/- + (सेवाकर) हप्ता असून तो दरवर्षी लाभार्थ्याच्या बँक खात्यातून आपोआप वर्ग होणार आहे. सदरची रक्कम रूपये 12/- + (सेवाकर) ही  केंद्रशासनाकडून लाभार्थ्याच्या खात्या मध्ये वर्ग करण्यात येणार आहे. तरी सर्व माजी सैनिक व त्यांच्या अवलंबितांना कळविण्यात येते कि, आपल्या  पेन्शन आकौंटच्या पहिल्या पानाची सुस्प्ष्ट छायांकित प्रत, खाते क्रमांक, आय. एफ. सी. कोड व  माजी सैनिक ओळखपत्रासह या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  रायगड-अलिबाग यांच्या कार्यालयात जमा करावी असे अवाहन,  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  रायगड-अलिबाग यांनी केले आहे.
000




Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन