प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना असंघटीत कामगारांसाठी लाभदायी --निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे
अलिबाग, जि. रायगड, दि.30 (जिमाका) - जिल्ह्यातील विविध उद्योग व अन्य क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटीत कामगारांच्या वृध्दापकाळासाठी व सामाजिक सुरक्षेसाठी शासनाची प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन महत्वाकांक्षी योजना लाभदायक असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्यश्री बैनाडे यांनी आज येथे दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात कामगार आयुक्त कार्यालय, पनवेल यांनी असंघटीत कामगारांकरिता प्रधानमंत्री श्रमयोगी योजना व लघु व्यापाऱ्याकरिता राष्ट्रीय निवृत्ती योजना सप्ताह साजरा करण्याबाबत आयोजित केलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.पद्मश्री बैनाडे पुढे म्हणाल्या की, या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या व्यक्तीचे वय 18 ते 40 वर्षे वयोगटातील असावे, लघु व्यापाऱ्यांकरिता त्यांची वार्षिक उलाढाल 1.5 कोटी किंवा त्यापेक्षा कमी असावी,ती व्यक्ती आयकर भरणारी नसावी,कर्मचारी राज्य विमा निगम,भविष्य निर्वाह निधी अथवा राष्ट्रीय पेन्शन योजना व प्रधानमंत्री मानधन योजनेचा सभासद नसावा. तसेच या योजने...