रायगड जिल्हा परिषद मध्ये संविधान दिन साजरा




अलिबाग, जि. रायगड, दि.26(जिमाका)- भारतीय संविधान दिनानिमित्त रायगड जिल्हा परिषदेच्या सुरबा नाना टिपणीस सभागृहामध्ये वरिष्ठ लेखाधिकारी संजीव मोरे यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन करुन संविधान दिनाचे महत्व सविस्तरपणे सांगितले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ॲङआस्वाद पाटील हे यावेळी उपस्थित होते. 
तसेच कार्यक्रमास कृषी व पशुसंवर्धन सभापती प्रमोद पाटील, सामान्य प्रशासन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर,माजी जिल्हा परिषद सदस्या श्रीम.गीता पालरेचा, कृषि अधिकारी लक्ष्मण खुरकुटे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी गजानन लेंडी,माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारी एम.जी.दळवी  आणि विविध विभागाचे खाते प्रमुख उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान