ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मतदान यंत्रांबाबत जनजागृती मोहिम यशस्वीपणे राबवा--उपजिल्हाधिकारी श्रीम.वैशाली माने
अलिबाग,जि. रायगड, दि.21 :- आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट संदर्भात जनजागृती मोहिम जिल्ह्यात यशस्वीपणे राबवावी, असे निर्देश उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीम.वैशाली माने यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित ईव्हीएम व व्हीव्हीपॅट संदर्भात अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मार्गदर्शन करताना श्रीमती. माने म्हणाल्या की, आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेप्रमाणे दि. 24 डिसेंबर 2018 पासून जिल्ह्यात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती मोहिम राबविण्या त येत आहे. यासाठी पाच सदस्यांची एक टिम तयार करण्यात येऊन प्रत्येक दिवशी 4 प्रात्यक्षिके दाखविणे आवश्यक आहे. ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक दाखविताना तेथे जास्तीत जास्त नागरिक जमा होतील ते पहावे व प्रात्यक्षिक पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या काही अडीअडचणी असतील तर त्या सोडविण्याचाही प्रयत्न करावा. स्ट्राँगरुमम...