गॅस पाईपलाईन शेतकरी मोबदला प्रकरणी 15 दिवसांत सर्वेक्षण पूर्ण करा-पालकमंत्र्यांचे आदेश



अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.21:- रिलायन्स गॅस पाईपलाईन्स लिमिटेड कंपनीकडून देहेन नागोठणे या इथेन पाईपलाईन प्रकल्पात ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून ही पाईप लाईन गेली त्या शेतकऱ्यांना द्यावयाच्या मोबदल्यासंदर्भात  शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत  राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री  जिल्ह्याचे तथा पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त बैठक घेतली.येत्या 15 दिवसांत सक्षम प्राधिकाऱ्यांनी सर्वेक्षण पुर्ण करुन अहवाल सादर करावा असे आदेश  यावेळी ना.चव्हाण यांनी दिले.
रिलायन्स गॅस पाईपलाईन कंपनी लिमिटेड यांच्याकडून पेण, खालापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अदा केलेल्या मोबदल्याबाबत राजस्व सभागृहात पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखली बैठक पार पडली. या बैठकीस उपजिल्हाधिकारी रविंद मठपती, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, रिलायन्स गॅस पाईपलाईन प्रकल्पाचे सक्षम प्राधिकारी  पांडुरंग मकदुम,पेण तहसिलदार अजय पाटणे तसेच रिलायन्स कंपनीचे राजेंद्र धड्डा, एस. जयचंद्रन, एल कुमार्वेल, एस.डी. घोडके तसेच शेतकऱ्यांचे नेते विष्णू पाटील व सर्व शेतकरी उपस्थित होते.
यावेळी ज्या ज्या शेतकऱ्यांना निर्धारित दराप्रमाणे मोबदला मिळून आक्षेप आहे अशांनी  व या पाईप लाईन मुळे ज्यांचे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे सादर करावी, असे सांगण्यात आले. त्यानंतर  येत्या 15 दिवसांत सर्वेक्षण पूर्ण करुन प्रत्यक्ष नुकसानीचा अहवाल सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री चव्हाण यांनी दिले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक