आरोग्यमंत्र्यांनी केली माथेरान येथील रुग्णालयाची पाहणी:आरोग्यसुविधेसाठी माथेरान मध्ये 'महाबळेश्वर पॅटर्न'- ना.डॉ. दीपक सावंत

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.28- माथेरानमधील आरोग्य सुविधेविषयी राज्य सरकार जागरूक आहे. उद्योजकांकडून सामाजिक सहायता निधी उभारून महाबळेश्वर मध्ये आरोग्य व्यवस्था प्रदान केली जात आहे त्याच पद्धतीने माथेरान मध्ये आरोग्य सुविधा देण्यात येतील. याठिकाणी दर 15 दिवसांनी महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात येईल. महाआरोग्य शिबिरासाठी औषधेही त्याच माध्यमातून उपलब्ध करण्यात येतील, अशी घोषणा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज माथेरान ता. कर्जत येथे केली. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज माथेरान गिरीस्थान नगरपालिकेच्या दवाखान्याची पाहणी करुन तेथील आरोग्य सुविधेविषयी माहिती घेतली.त्यांनी आरोग्य विभागाच्या पथकासह माथेरान मधील सरकारी दवाखान्याची पाहणी केली. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, माथेरानच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत, राज्याचे आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, प्रांताधिकारी दत्...