सोमवारपासून दक्षता जनजागृती सप्ताह
अलिबाग,जि.
रायगड (जिमाका) दि.27- भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती होण्यासाठी शासन दि 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या कालावधीत
दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करत असते. यंदाही सोमवार दि.30 पासून जिल्ह्यात
विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांची सुरुवात रायगड जिल्हा लाचलुचपत
प्रतिबंधक विभागाच्या अलिबाग कार्यालयात शपथ देवून सप्ताहाची सुरुवात वरिष्ठांचे
संदेश वाचन करुन होणार आहे. त्यानंतर अधिक्षक जिल्हा डाकघर रायगड अलिबाग येथे
जनजागृती बैठक व पत्रके वितरण, अलिबाग
शहरात शासकीय कार्यालय, बस स्थानक, समुद्रकिनारा, स्थानिक बाजारपेठ येथे पत्रके
वाटणे व स्टीकर चिकटवणे, जनजागृती करणे. अलिबाग शहर परिसरातील शाळा, कॉलेज मध्ये
जनजागृती करण्यासाठी मिटींगचे आयोजन करण्यात येणार आहे.
दि. 31 ऑक्टोंबर, रोजी सकाळी 11 वाजता आरसीएफ
कंपनी थळ तर्फे कुरुळ येथे आयोजित जनजागृती मिटींगकरिता अधिक्षक जिल्हा डाकघर
रायगड उपस्थित राहून मार्गदर्शन ल. दुपारी 4 वाजता बँक ऑफ इंडिया मुख्य कार्यालय अलिबाग तर्फे आयोजित बैठकीत
मार्गदर्शन. पेण, वडखळ, पोयनाड या हद्दीत शासकीय कार्यालये, बस स्थानक, स्थानिक
बाजारपेठ येथे पत्रके वाटणे व स्टीकर चिकटवणे, याद्वारे जनजागृती .
दि.1 नोव्हेंबर, रोजी सकाळी 11 वाजता गेल इंडिया
लि.कंपनी उसर तर्फे आयोजित जनजागृती मिटींग ,मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर
खालापूर सावरोली टोल नाका येथे फ्लेक्स बॅनर लावणे. खोपोली, कर्जत, रसायनी येथे
जनजागृती मिटींगचे आयोजन करुन खोपोली, खालापूर, रसायनी, कर्जत, नेरळ या हद्दीत बस
स्थानक, स्थानिक बाजारपेठ, शासकीय कार्यालये येथे पत्रके वाटणे व स्टीकर चिकटवणे,
जनजागृती करण्यात येईल.
दि.2नोव्हेंबर, रोजी रेवदंडा, मुरुड, श्रीवर्धन,
म्हसळा, दिघी या हद्दीत बस स्थानक, स्थानिक बाजारपेठ, समुद्र किनारे, शासकीय
कार्यालय येथे पत्रके वाटणे, व स्टीकर चिकटवणे, जनजागृती करणे. मुरुड, श्रीवर्धन
या तालुक्याचे ठिकाणी जनागृती मिटींगचे आयोजन करण्यात येईल.
दि. 3 नोव्हेंबर रोजी नागोठणे, रोहा, माणगांव,
महाड, पोलादपूर या हद्दीत बस स्थानके, स्थानिक बाजारपेठ, शासकीय कार्यालय येथे
पत्रके वाटणे व स्टीकरणे चिकटवणे, जनजागृती करणे. महाड, माणगांव या तालुक्याचे
ठिकाणी जनजागृती मिटींगचे आयोजन करण्यात येईल. महाड शहर परिसरातील व्यापारी
संघटना, रिक्षा चालक, मालक संघटना यांच्या जनजागृती मिटींगचे आयोजन करण्यात येईल.
दि.4 नोव्हेंबर, रोजी सकाळी 11 वाजता अलिबाग शहर
परिसरातील मेडिकल असोसिएशन यांची जनजागृती मिटींग, दुपारी 1 वाजता अलिबाग शहर परिसरातील हॉटेल
असोसिएशन व दुपारी 4 वाजता अलिबाग शहर परिसरातील हॉटेल असोसिएशन जनजागृती मिटींग.
000000
Comments
Post a Comment