पाणी पुरवठा तात्काळ सुरु होण्यासाठी उपाययोजना करा- जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी

माथेरान डोंगरातील आठ वाड्यांच्या पाणी प्रश्नी बोलावली तातडीची बैठक अलिबाग, जि. रायगड, दि.24 (जिमाका)- :- माथेरान डोंगरात असलेल्या आठ वाड्यांना उपाययोजना करुन तात्काळ पाणी पुरवठा सुरळीत करा, असे आदेश आज जिल्हाधिकारी डॉ. विजय सूयवंशी यांनी यंत्रणांना दिले. यासंदर्भात कविता वसंत निरगुडे या युवतीने जिल्हाधिकाऱ्यांना थेट पत्र लिहून आपली व्यथा मांडल्याबाबत स्थानिक वृत्तपत्रांतून बातम्या प्रसारित झाल्या होत्या. त्याची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली. तत्पूर्वी संबंधित प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी यांना प्रत्यक्ष वाड्यांवर पाठवून तेथी परिस्थितीचा अहवाल मागविला. त्यानंतर त्यांनी बैठक बोलावून या प्रश्नाची सोडवणूक करण्याबाबत चर्चा केली. या परिसरातील सागाची वाडी, आसल वाडी, बोरीची वाडी, भुतिवली वाडी, चिंचवाडी, धनगरवाडा, धामणदांडा, नाचण्यामाळ या आठ वाड्यांचा पाणी प्रश्न बिकट होत आहे. त्यासंदर्भात या वाड्यांच्या समोर असलेल्या पाली भूतिवली धरणातून कायम स्वरुपी पाणी पुरवठा व्हावा, अशी स्थानिक रहिवाशांची मा...