सामाईक प्रवेश परीक्षा-2018 जिल्ह्यात सुमारे साडे आठ हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10- सक्षम प्राधिकारी व संचालक,सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सन 2018 ची सामाईक प्रवेश परीक्षा आज पार पडली. जिल्ह्याभरातून 20 परीक्षा केंद्रांवर 8 हजार 485 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. परीक्षा सुरळीत व शांततेच्या वातावरणात पार पडली.सुमारे 250 विद्यार्थी परीक्षेस अनुपस्थित राहिले.अलिबाग तालुक्यात 11 तर पेण येथे 9 अशा एकूण 20 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेच्या आयोजनासाठी 750 अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते. या दरम्यान जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती, सूत्रांनी दिली आहे. ...