सामाईक प्रवेश परीक्षा-2018 जिल्ह्यात सुमारे साडे आठ हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10- सक्षम प्राधिकारी व संचालक,सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सन 2018 ची सामाईक प्रवेश परीक्षा आज पार पडली. जिल्ह्याभरातून  20 परीक्षा केंद्रांवर 8 हजार 485 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. परीक्षा सुरळीत व शांततेच्या वातावरणात पार पडली.सुमारे 250 विद्यार्थी परीक्षेस अनुपस्थित राहिले.अलिबाग तालुक्यात 11 तर पेण येथे 9 अशा एकूण 20 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली.  या परीक्षेच्या आयोजनासाठी 750 अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते. या दरम्यान जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती, सूत्रांनी दिली आहे.
                                                                             ०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक