Posts

Showing posts from July 12, 2026

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्तीकरिता विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत

    रायगड-अलिबाग,दि.14(जिमाका): रायगड जिल्ह्यातील मांग समाजातील मांग, मातंग, मिनी मादिगा, मादगी, दानखणी मांग, मांग महाराशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या 22 पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेले व सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. करिता महामंडळाकडून सरासरी 60 टक्के पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडून "साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती" करिता अर्ज मागविण्यात येत आहेत. अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुणवत्तापूर्वक उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, रेशनकार्ड, आधार कार्ड, शाळेचा दाखला, मार्कशीट, 2 फोटो, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इत्यादींसह दोन प्रतीत आपले पूर्ण पत्त्यासह व भ्रमणध्वनी क्रमांकासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), केमेज हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड, हॉटेल मीरा माधव, ऑफिस क्र. 208, पहिला मजला, अलिबाग डेपोच्या समोर, पोस्ट-अलिबाग, ता.अलिबाग येथे दि. 27 ज...

शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजना इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत

  रायगड-अलिबाग,दि.14(जिमाका): शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ व महामंडळाच्या इतर 13 उपकंपन्यामार्फत लघुउद्योग व व्यवसायाकरीता इतर मागासप्रवर्गातील गरजू व होतकरु व्यक्तींना कर्ज पुरवठा केला जातो. त्या अनुषंगाने सन 2026-27 या वित्तीय वर्षाकरीता विविध योजनांचे रायगड जिल्ह्याकरीता भौतिक व आर्थिक उदिष्ट प्राप्त झाले आहे. या ऑनलाईन योजनांमध्ये 20 टक्के बीज भांडवल योजना व 1.00 लक्षपर्यंत थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, गट कर्ज व्याज परतावा, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा व महिला स्वयंसिध्दी कर्ज व्याज परतावा योजना इत्यादी योजनांचा समावेश आहे. रु.1.00 लक्ष थेट कर्ज योजनेकरिता अर्जदाराचा सिबिल क्रेडीट स्कोर हा किमान 500 असणे बंधनकारक आहे. सर्व ऑनलाईन योजनांसाठी सर्वप्रथम महामंडळांच्या www.msobcfdc.org ,  या वेबसाईटवर जाऊन स्वतःची नोंदणी करुन घ्यावी. अर्जदाराने स्वतःच्या जातप्रमाणपत्रातील नमूद जातीनुसार लागू असलेले महामंडळाच्या उपकंपनीमध्ये जाऊन आवश्यक ती योजना निवडावी. तद्नंतर अर्जदाराने महामंडळाच्या नियमानुसार आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या PDF सुस्पष्...

जिल्ह्यातील तृतीयपंथी व्यक्तींना बीज भांडवल कर्ज योजनेंतर्गत अर्ज सादर करावेत

    रायगड-अलिबाग,दि.14(जिमाका): सामाजिक न्याय विभागातंर्गत तृतीयपंथी नागरिकांना शासन निर्णय दि.13 मार्च 2026 उद्योगासाठी बीजभांडवल कर्ज योजना मंजूर करण्यात आली आहे. एकूण 21 योजनांना लघु, मध्यम व दिर्घ कर्जाच्या योजनेकरीता कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच 12 व्यवसायांकरिता आवश्यक साधने संच (tool kit) करिता कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सहायक आयुक्त, समाज कल्याण  सुनिल जाधव यांनी दिली आहे. योजनेचे निकष, अटी शर्ती व लाभाचे स्वरूप :-अर्जदार महाराष्ट्र राज्याचा किमान 10 वर्ष रहिवासी असावा. तृतीयपंथी ओळख प्रमाणपत्र आवश्यक आहे. लाभार्थी हा 18 ते 50 वर्ष वयोगटातील व्यवसाय करण्यास सक्षम असावा.या योजनेत लघु कर्ज (रु. 25,000/-) मध्यम कर्ज (रु 50,000/-) व दिर्घ कर्जासाठी (रु.,2,00,000/-) एक कर्ज अनुज्ञेय राहील. या योजनेत स्वंयहिस्सा 5 टक्के, शासन अनुदान 45 टक्के व राष्ट्रीयीकृत बँकेकडून 50 टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. लाभार्थ्यांना व्यवसाय परवाना, व्यवसायासाठी लागणाऱ्या यंत्र सामुग्रीचे कोटेशन, जागेचा पुरावा (7/12 किंवा भाडेकरार पत्र) व्यवसायासाठी स्थानिक...

आर्थिक विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजना इच्छुकांनी योजनेच्या अधिक माहितीकरीता संपर्क साधावा

  रायगड-अलिबाग,दि.14(जिमाका): उद्योजकांकरीता वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या) व उपकंपन्या राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, पैलवान कै.मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ, श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ, ब्रह्मलिन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ, विणकर समाज आथिक विकास महामंडळ, श्री. शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ या महामंडळाच्या विविध कर्ज योजना असून इच्छुक, गरजु विजाभज व वि.म. प्रवर्गातील व्यक्तींना योजनेच्या अधिक माहितीकरीता संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक संदिप चव्हाण यांनी केले आहे. राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विषेश मागास प्रवर्गातील समाजाच्या दुर्बल घटकांच्या सर्वागीण विकासासाठी शासनांने वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या) व इतर उपकंपने या महामंडळाच्या स्थापना केली आहे. तसेच समाजातील आर्थिक उन्नतीसाठी महामंडळामार्फत स्वयंरोजगारांच्या विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. छोटे व्यावसायीक व स्वयंरोजगारांकरीता रु.1.00 लाख थेट कर्ज योजना ( नियमित परतफेड करणा-या ...