साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्तीकरिता विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत

 

 

रायगड-अलिबाग,दि.14(जिमाका): रायगड जिल्ह्यातील मांग समाजातील मांग, मातंग, मिनी मादिगा, मादगी, दानखणी मांग, मांग महाराशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या 22 पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेले व सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. करिता महामंडळाकडून सरासरी 60 टक्के पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडून "साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती" करिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुणवत्तापूर्वक उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, रेशनकार्ड, आधार कार्ड, शाळेचा दाखला, मार्कशीट, 2 फोटो, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इत्यादींसह दोन प्रतीत आपले पूर्ण पत्त्यासह व भ्रमणध्वनी क्रमांकासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), केमेज हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड, हॉटेल मीरा माधव, ऑफिस क्र. 208, पहिला मजला, अलिबाग डेपोच्या समोर, पोस्ट-अलिबाग, ता.अलिबाग येथे दि. 27 जुलै 2026 पर्यंत अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) वैशाली मुडळे यांनी केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान