चक्रीवादळामुळे झालेले नुकसान व प्रशासन करीत असलेल्या कार्यवाहीबाबत आढावा बैठक संपन्न

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19- जिल्ह्यातील दि.3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. या चक्रीवादळामुळे झालेले नुकसान व प्रशासन करीत असलेल्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी खा.सुनिल तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, सर्जेराव मस्के पाटील (सा.प्र.), जिल्हा कृषी अधीक्षक पांडुरंग शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी डॉ.बी.के आर्ले, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी लक्ष्मण खुरकुटे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा आर.पी.कोळी, शाखा अभियंता ग्राम...